आयुर्वेदिक चहा काय आहे आणि याचा वापर कसा केला जातो ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  साधारण चहामध्ये कॅफिन असल्याने आरोग्याला तो अपायकारक ठरतो. या चहाऐवजी आयुर्वेदिक चहा सेवन करावा. आयुर्वेदात चहा शब्दाचा वापर होत नाही, यास काढा म्हणतात. तुम्ही यास हर्बल टी म्हणू शकता, यामध्ये कॅफीन अजिबात नसते. वनस्पती आणि देशी मसाले वापरले जातात. हा हर्बल टी शरीरातील दोष बॅलन्स ठेवतो. हा वात, पित्त आणि कफ दोष संतुलित करून शरीराचे संतुलन ठेवतो.

आयुर्वेदिक चहाचे फायदे आणि कृती
शरीर डिटॉक्टस करून जीवन गुणवत्ता सुधारते. यासाठी उकळत्या पाण्यात एक चतुर्थांश चमचा वाटलेली बडीसोफ, जीरा आणि धने टाकून 10 मिनिटे उकळवा. नंतर गाळून कोमट करून मध मिसळून प्या.

पचनशक्ती ठीक ठेवतो. तूप, मीठ आणि गरम पाण्यापासून तयार केलेला चहा बद्धकोष्ठतेमध्ये दिलासा देतो.

गरमपाण्यात बडीसोफ आणि आले खिसून उकळवून प्यायल्याने ब्लोटिंगची समस्या दूर होते.

पोटाच्या समस्येसाठी बडीसोफ, तुळशीची पाने किंवा लवंग चावू शकता किंवा यापासून चहा बनवू शकता.

वजन कमी करण्यासाठी आले, लवंग आणि ज्येष्ठीमध पासून तयार केलेला चहा प्यावा. 250 मिली. पाण्यात छोटा तुकडा आले, ज्येष्ठ मधाचा तुकडा आणि 3-4 लवंग टाकून 10 मिनिटे उकळवा. नंतर गाळून सेवन करा.

त्वचा उजळवण्यासाठी एका भांड्यात अगोदरच पाणी गरम करा. नंतर यात थोडे आले, चमुटभर हळद आणि दालचिनी टाकून काही मिनिटे उकळवा. उतरवल्यानंतर कोमट करून त्यामध्ये लिंबू रस आणि गोडीसाठी थोडे मध टाकून प्या. या चहामध्ये आईस क्यूब टाकून कोल्ड टीचा आनंद घेऊ शकता.

इम्यूनिटी वाढवण्यासाठी गरम पाण्यात दालचीनी, वेलची, आले आणि काळीमिरी उकळवा आणि नंतर कोमट करून याचे सेवन करा.