‘कोरोना’ व्हायरसनंतर ‘ब्युबोनिक प्लेग’चं संकट, या लक्षणाकडे दुर्लक्ष करून नका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून उद्भवलेल्या कोरोना महामारी साथीने जगभरात थैमान घातले आहे. या साथिच्या विरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. कोरोनाविरोधात लढा देत असताना आता आणखी एक आजार पसरण्यास सुरुवात झाल्याची बातमी समोर येत आहे. या रोगाचे नाव ब्युबोनिक प्लेग आहे. हा आजार पिसवांमुळे पसरतो. उत्तर चीनमध्ये दोन भावांना हा आजार झाल्यानंतर आता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधिची पहिली माहिती चीनच्या एका वृत्तसंस्थेने दिली आहे. ज्या दोन भावांना याची लागण झाली ते 27 आणि 17 वर्षाचे आहे. त्यांनी मर्मोट (एक प्रकारची खार) खाल्ली होती.

ब्युबोनिक प्ले म्हणजे काय ?
हा दुर्मिळ आजार आहे. पण यात गंभीर जीवाणू संसर्ग होतो. हा एक प्राणीजन्य आजार असून तो प्रण्यांपासून मानवला होतो. हा बाधित पिसवा मनुष्याला चावला तर ब्युबोनिक प्ले होतो. हा आजार बाधित प्राण्याच्या रक्ताच्या किंवा मलमूत्राच्या संपर्कात आल्याने देखील होऊ शकतो. या आजाराच्या रुग्णाला तात्काळ उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जर वेळीच उपचार मिळाले नाही तर 24 तासाच्या आत बाधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. उपचाराअभावी या रोगाच्या 60 टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

ब्युबोनिक प्लेगची लक्षणे
ब्युबोनिक प्लेगची बाधा झाल्यास व्यक्तिच्या लसिका ग्रंथींना सूज येते. या ग्रंथी काखेत किंवा मानेवर येतात. सुजल्यावर या ग्रंथींचा आकार अंड्यासारखा होतो. याशिवाय ताप, थंडी, डोके दुखणे, थकवा येणे आणि स्नायू दुखणे ही इतर लक्षणे दिसून येतात.डॉ. अजय मोहन यांनी सांगितले की, प्लेग एक प्रकारचा संसर्ग आहे. जो योर्सिनिया पेस्टिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा जीवाणू मुख्यत्वे उंदरामध्ये असतो आणि त्या उंदरांवरील पिसवांमार्फत तो पसरतो.

 

हा नवीन आजार आहे ?
हा आजार पहिल्यांदाच दिसून आलेला नाही. 2010 आणि 2015 पर्यंत ब्युबोनिक प्लेगचे 3200 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते. यातील 584 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 14 व्या शतकात ब्युबोनिक प्लेगमुळे आशिया, युरोप आणि आफ्रीकेमध्ये 50 दशलक्ष लोक मृत्यूमुखी पडले होते

साथ होऊ शकते का ?
सध्या या रोगाचे 146 रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संशोधकांना शंका आहे, हा आजार सहजपणे व्यक्ती-व्यक्ती द्वारे संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे जगभरात याची साथ पसरु शकते. चीनी संशोधकांच्या म्हणण्यानुसार, डुकरांशी संबंधित व्यवसायातील लोकांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

कसे होतात उपचार ?
myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांच्या म्हणण्यानुसार, प्लेग हा गंभीर आजार आहे. पण त्यावर उपचार केले जाऊ शकतात. सर्वसाधारण अँटीबायोटिक औषधांनी त्याच्यावर उपचार केले जातात. तरीही ब्युबोनिक प्लेगच्या उपचारांविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही.