चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे ‘हे’ आहेत अधिकार, जाणून घ्या

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७३ व्या स्वतंत्रदिनानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. देशभर स्वतंत्रदिन उत्साहात साजरा होत असताना मोदींनी आज गुरुवार (ता.१५) स्वतंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन नुकतीच एक घोषणा केली. भारताच्या तिन्ही सुरक्षा दलामध्ये समन्वय राखण्यासाठी सरकार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ची (सीडीएस) नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदावर असणारी व्यक्ती तिन्ही दलाचे नेतृत्व करेल. त्यामुळे देशातील तिन्ही दलात समन्वय साधणे सोपे होणार असून युद्धसदृश परिस्थितीत निर्णयांवर जलद गतीने अंलमबजावणी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

मोदी म्हणाले, ”चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ पदाची लवकरच नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना सैन्यासंर्दभात महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात येतील. नाटो म्हणजेच नॉर्थ अ‍ॅटलॅंटिक ट्रिटी ऑर्गनायझेसन शी जोडलेले सर्व देश या त्यांच्या देशाच्या सैन्याच्या सर्वोच्च पदी चीफ ऑफ डिफेन्सची नियुक्ती करतात. देशातील सशस्त्र दलात त्याचे अधिकार सर्वोच्च ठिकाणी असतात. युनायडेट किंगडम, श्रीलंका,इटली, फ्रांससह दहा देशात सध्या चीफ डिफेन्स ऑफ स्टाफची नियुक्ती केली जाते. प्रत्येक देशात त्यांना वेगवेगळे अधिकार देण्यात आले आहेत. भारतातही या स्टाफच्या नियुक्तीने तिन्ही दलामधील संबंध मजबूत होणार आहेत. ब्रिटनमध्ये सीडीएम सर्व सशस्त्र दलाचा मुख्याधिकारी असतो. तो तेथील रक्षा मंत्रालय आणि पंतप्रधानाचा सैन्यातील सल्लागार असतो. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहण्यासाठी भारतातही सीडीएस ची नियुक्ती केली जाईल. सीडीएस देशाला एक चांगले नेतृत्व प्रदान करेल.”

सीडीएस रक्षामत्र्याच्या सैन्य सल्लागारपदी काम करेल. भारतात कारगिल सुरक्षा समितीने या पदासाठी प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर २००६ मध्ये याबात सर्वपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर २०१७ मध्ये कॅबिनेट समितीने या पदासाठी अंतिम निर्णय प्रक्रिया सुरु केली. याचा परिणाम म्हणजे लवकरच देशाच्या सैन्यात CDSची नियुक्ती होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –