डर्मटायटीस म्हणजे काय ? जाणून घ्या ‘प्रकार’, ‘लक्षणं’ अन् ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम

डर्मटायटीस म्हणजे काय ?

त्वचेवर येणारी सूज म्हणजे डर्मटायटीस आहे. हे बऱ्याचदा मुलांवर (15- 23 % जागितक पातळीवर) परिणाम करते. भारतीय मुलांमध्ये याचा प्रसार आणि याच्या घटना कमी आढळून आल्या आहेत.

डर्मटायटीसची सर्वात सामान्य प्रकार पुढील प्रमाणे –

– आटोपीक डर्मटायटीस
– कॉन्टॅक्ट डर्मटायटीस
– सेबॉऱ्हिक डर्मटायटीस

काही सामान्य लक्षणं –

1) लालसरपणा
2) वेदना
3) पापुद्र असलेला फोड येणं
4) खूप खाजवणं
5) सूज

याची कारणं काय आहेत ?

– अनुवांशिक कारण
– अॅलर्जी
– विविध मूलभूत आरोग्यविषयक परिस्थिती
– त्वचेचे कोणत्याही प्रकराचे बाधक

कसं केलं जातं निदान ?

डॉक्टर चिन्ह आणि लक्षणांबद्दल विचारू शकतात. अॅलर्जी पॅच चाचणी ही कोणतीही अॅलर्जी ओळखण्यासाठी केली जाते. याशिवाय काही पुढील चाचण्या केल्या जातात.

– प्रिक किंवा रेडिओअॅलर्जोसोर्बंट (आरएएसटी) चाचणी
– जंतूंची कृत्रिम वाढ तपासण्यासाठी त्वेचाच स्वॅब
– त्वचेची बायोप्सी

काय आहेत यावर उपचार ?

लक्षणं आणि दाहाची तीव्रता पाहून यावर उपचार केले जातात.

– टॉपिकल स्टिरॉईड क्रीम निर्धारीत केल्या जातात.
– रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणाऱ्या टॉपिकल क्रीम देखील निर्धारीत केल्या जाऊ शकतात.
– प्रकाश उपचार आणि फोटो थेरपी

काळजी घेण्यासाठी काही टीप्स

– निर्धारीत केलेली औषधे किंवा अँटी इच उत्पादनांचा वापर काळजीपूर्वक करा.
– थंड किंवा ओले कॉम्प्रेशन्स त्वचेला शांत करू शकतात.
– उबदार पाण्यानं अंघोळ केल्यास लक्षणं दूर होऊ शकतात.
– सूजलेल्या त्वचेला खरवडणे किंवा चोळणे टाळावे

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.