‘बहिणाबाई’ शब्दामुळं यातना का होतात अन् चक्कर का येते हे ठाऊक नाही :शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हटल्याने आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. परळीमध्ये रंगलेल्या मुंडे भाऊ-बहीणीमधील शाब्दिक वादावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई बोलल्याचे मी एकलंय त्यात वावग काहीच नाही. या शब्दात यातना होण्यासारख काय आहे, असा टोला त्यांनी लगावला.

परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये लढत होत आहे. पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. महाराष्ट्रामध्ये बहिणाबाईंच्या कविता आम्ही लहानपणापासून म्हणल्या आहेत. बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून अनेक विचार मांडले आहेत. त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राने अगदी आनंदाने केला. त्यामुळे बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई या शब्दामुळे यातना का होतात अन् चक्कर का येते हे मला माहिती नाही, असे शरद पवार म्हणाले.

महिला आयोगालाही सुनावले –
पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्या वादात राज्य महिला आयोगने तत्परता दाखवत धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रारीची गंभी दखल घेतली. शरद पवारांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. महिला आयोगावर सामान्यपणे सत्ताधारी पक्षाचे लोक असतात. पण आपण भाजपचे प्रतिनिधी म्हणून बसलो हे दाखवायलाच पाहिजे असं काही नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

Visit  :Policenama.com