नोकरदारांसाठी खुशखबर ! दुप्पट पेंशनसह ‘या’ 2 मोठ्या निर्णयावर आज EPFO कडून ‘शिक्कामोर्तब’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून मोठी घोषणा करण्यात येऊ शकते. EPFO ची 21 ऑगस्टला हैद्रबादमध्ये बैठक होणार आहे. यात किमान पेंशन 1000 रुपयांवरुन वाढून 2000 रुपये करण्याचा विचार करण्यात येत आहे. या बैठकीत पेंशन वाढण्यावर संमती मिळाल्यास याचा थेट फायदा पीएफ खातेधारकांना होणार आहे.

नोकरी करणाऱ्या ठिकाणी दर महिन्याला पगारातून पीएफसाठीची रक्कम कापण्यात येते, जी EPFO मध्ये जमा होते. पीएफमध्ये तुमच्या पगारातील कमीत कमी 12 टक्के योगदान असते तर उर्वरित 12 टक्के कंपनीकडून देण्यात येते. कंपनी तुमच्या पीएफमध्ये जे योगदान देते त्यात 8.33 टक्के पेंशन योजनामध्ये जाते आणि उर्वरित 3.67 टक्के EPF मध्ये जाते.

21 ऑगस्टला होऊ शकतात हे महत्वपूर्ण निर्णय –
पहिला निर्णय –
हैदराबादच्या बैठकीत किमान पेंशन वाढून 2000 करण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला संमती मिळल्यास पेंशन वाढीची घोषणा करण्यात येईल.
1. किमान पेंशन वाढीबाबत सरकारने ईपीएफओ बरोबर चर्चा केली आहे. ईपीएफओने अतिरिक्त पैसे नसल्याने किमान पेंशनमध्ये वाढ करण्यास नकार दिला होता.
2. शेतकरी, कामगार आणि व्यापाऱ्यांना पेंशनची योजना सुरु करण्यात आल्यानंतर आता सरकार ईपीएफओच्या पेंशनरच्या पेंशनमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे.
3. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी संकेत दिले आहेत की पेंशनरची पेंशन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

दुसरा निर्णय –
या बैठकीत फंड मॅनेजरच्या रुपात HSBC, AMC, UTI आणि SBI म्यूचुअल फंडची नियुक्ती करण्यात येऊ शकते.
1. ही नियुक्ती 3 वर्षासाठी असू शकते. मॅनेजरच्या नियुक्तीचा निर्णय एप्रिलपासून अडून आहे.
2. CBT ने 1 एप्रिल 2015 पासून एसबीआय, आयसीआयसीआय सिक्युरिटीज प्राइम डीलरशिप, रिलायन्स कॅपिटल आणि एचएसबीसी एएमसीला तीन वर्षांसाठी नियुक्त केले होते.
3. ईपीएफओने 5 फंड मॅनेजरच्या कार्यकाळात वाढ केली होती. परंतू फंड मॅनेजर्सचा विस्तार कालावधी 30 सप्टेंबर 2019 ला समाप्त होणार आहे.

EPF पेंशनचा पैसा कधी मिळतो ? –
1. एका ठरलेल्या वेळेनंतर हा पैसा कर्मचाऱ्यांना मिळतो. परंतू पेंशनची रक्कम काढण्यासाठी अनेक नियम आहेत.
2. जर नोकरी 6 महिन्यापेक्षा जास्त आणि 9 वर्ष 6 महिन्यापेक्षा कमी असेल, ती व्यक्ती फॉर्म 19 आणि 10 C जमा करुन पीएफ रक्कमेसह पेंशनची रक्कम काढण्यात येते. परंतू यासाठी तुम्हाला पीएफच्या ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल.
3. सध्या ऑनलाइन पद्धतीने पेंशन फंड काढण्याची सुविधा सुरु करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांना यासाठी EPFO च्या कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल.
4. तुम्ही तुमचे पीएफ एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणार असाल तर तुमची सर्व सर्विस हिस्ट्री असून देखील तुम्ही पेंशनची रक्कम कोणत्याही परिस्थितीत काढू शकणार नाही.
5. विविध जागावर नोकरी करता करता तुमची सर्विस हिस्ट्री 10 वर्षांची होईल तेव्हा तुम्ही पेंशनवर हक्क दाखवू शकतात आणि 58 वर्षांनंतर तुम्हाला मासिक पेंशन सुरु होईल.