1.68 कोटी शेतकर्‍यांनी स्वतःचं ‘उत्पन्न’ वाढवण्यासाठी घेतला मोदी सरकारच्या ‘या’ स्कीमचा फायदा, तुम्ही घेतला का ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट म्हणजेच ई-नाम योजना सुरू केली आहे. शेती तसेच कृषी उत्पादनाशी संबंधित 1.68 कोटी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. केंद्रीय कृषी तथा कृषी उत्पादन मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या माहितीनुसार या योजनते 1,65,73,893 शेतकरी सहभागी झाले आहेत. 1,26,556 ट्रेडर आणि 70,655 कमीशन एजन्टसचीही नोंद करण्यात आली आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केटद्वारे कृषी उत्पादनांचा जास्त मोबदला मिळेल आणि उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.

सन 2017 पर्यंत ई बाजारमध्ये केवळ 17 हजार शेतकरी सहभागी झाले होते. ई नाम एक इलेक्ट्रॉनिक कृषी पोर्टल आहे. जे संपूर्ण भारतातील अ‍ॅग्री प्रॉडक्ट मार्केटिंग कमिटीला एका नेटवर्कमध्ये जोडण्याचे काम करते. याचा हेतू शेती उत्पादनाला राष्ट्रीय स्तरावर एक बाजार उपलब्ध करून देणे आहे. यातील फायदा पाहता शेतकरी मोठ्यासंख्येने यात सहभागी होत आहेत.

इंटरनेटने जोडले गेले देशातील 585 बाजार
ई-नाम अंतर्गत देशातील विविध राज्यातील कृषी उत्पन्न बाजारांना इंटरनेटद्वारे जोडले गेले आहे. संपूर्ण देश एक बाजार क्षेत्र व्हावा, हा यामागील हेतू आहे. जर गोरखपूरचा एखादा शेतकरी आपला माल बिहारमध्ये विकण्यास इच्छूक असेल तर हा कृषीमाल ने-आण करणे आणि मार्केटिंग करणे सोपे झाले आहे.

शेतकरी आणि खरेदीदार यांच्यामधील ई-नाम ने दलाल संपवले आहेत. याचा लाभ केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे, तर ग्राहकांनाही होणार आहे. शेतकरी आणि व्यापार्‍यांमधील या व्यवहारात स्थानिक कृषी उत्पन्न बाजारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, कारण सर्व व्यापार त्यांच्या माध्यमातून होणार आहे.

शेतकर्‍यांची ही चिंता झाली दूर
बाजार आणि कृषी मालाला चांगला भाव मिळणे ही शेतकर्‍याची सर्वात मोठी समस्या आहे. शेतकरी खुप कष्टाने पिक घेतो, काही महिन्यांनी पिक तयार झाले की, त्याच्या समोर बाजाराचे संकट उभे राहते. येथे त्यास कमी भाव मिळाला की त्याच्या समस्या वाढतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांची ही समस्या ओळखून शेतीमाल ऑनलाईन विक्रि करण्यासाठी देशभरात ई बाजार सुरू केले आहेत. म्हणजेच राष्ट्रीय कृषी बाजार होय.

याची सुरूवात 14 एप्रिल 2016 ला झाली. याअंतर्गत नोंदणी करून शेतकरी आपला माल चांगल्या भावाने विकू शकतात.

आता ते दलालांवर आवलंबून राहणार नाहीत. सरकारने आतापर्यंत देशातील 585 बाजार ई-नाम ने जोडले आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहीतीनुसार एसएफएसी ई-नाम सुरू करणारी सर्वात मोठी संस्था आहे. सरकारची ही योजना यावर्षी 200 आणि पुढच्या वर्षी 215 बाजारांना जोडणार आहे.

देशात सुमारे 2700 कृषी उत्पन्न बाजार आणि 4000 उप बाजार आहेत. प्रथम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अथवा राज्यातील दोन बाजारात व्यवहार होत असत. नुकताच प्रथमच दोन राज्यातील वेगवेगळ्या बाजारांमध्ये ई-नाम व्यापार झाला आहे.

ई-नाममध्ये सहभागी होण्यासाठी…

1. प्रथम तुम्हाला सरकारच्या www.enam.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

2 .यानंतर रजिस्ट्रेशन टाईप करावे लागेल. येथे शेतकर्‍याचे एक ऑपशन दिसेल.

3. यानंतर तुम्हाला ई-मेल आयडी द्यावा लागेल. यात तुम्हाला इमेलद्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

4. यानंतर तुम्हाला तात्पुरता ई मेल आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल. तुम्ही www.enam.gov.in च्या वेबसाईटवर लॉगिन करून डॅशबोडवर KYC कागदपत्रांसह रजिस्ट्रेशन करू शकता.

5. PMCने तुमच्या KYC ला मान्यता दिल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवहार सुरू करू शकता.

6. https://enam.gov.in/web/resources/registration-guideline वर सर्व माहिती उपलब्ध आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/