Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने नुकतेच विविध करांचा भरणा करण्यासाठी कालावधी वाढवला आहे. यामध्ये फॉर्म क्रमांक 16 (Form 16) चा सुद्धा समावेश आहे, जो कंपनीने 31 जुलैपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सरकारने इन्कम टॅक्सशी संबंधीत 8 कामांची तारीख पुढे वाढवली आहे. ज्यामुळे करदात्यांना कोरोना महामारीच्या दरम्यान काही सवलत मिळाली आहे. कंपन्यांसाठी फार्म -16 (Form 16) च्या रूपात टीडीएस सर्टिफिकेट कर्मचार्‍यांना देण्याची कालमर्यादा 15 जुलै, 2021 वरून वाढवून 31 जुलै, 2021 करण्यात आली आहे. what is form 16 and what is its use know the answer to every question related to it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) एका वक्तव्यात म्हटले, कोविड -19 महामारीच्या प्रभावामुळे करदात्यांना काही कर पालन पूर्ण करणे आणि विविध नोटीशींना उत्तर दाखल करण्यात असुविधेचा सामना करावा लागत आहे. या कठिण काळात करदात्यांचा कर पालन भार कमी करण्यासाठी सवलत दिली जात आहे.

फॉर्म-16 एक टीडीएस सर्टिफिकेट आहे, जे तुमचे सर्व कर योग्य उत्पन्न आणि स्त्रोतावर विविध कर कपात (TDS) एकत्रित करते. हे आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी सर्वात आवश्यक कागदपत्रांपैकी आहे. हे असे प्रमाणपत्र आहे, जे कंपनीकडून आपल्या कर्मचार्‍यांना दिले जाते. हे त्या वस्तूस्थितीला दुजोरा देते की, कर्मचार्‍याकडून अधिकार्‍यांकडे टीडीएस कापला आणि जमा केला आहे.

फॉर्म-16 कंपनीद्वारे जारी केला जातो आणि यामध्ये ती माहिती असते, जी तुमच्या टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आवश्यक असते. फॉर्म-16 मध्ये दोन भाग असतात – पार्ट ए आणि पार्ट बी.

मोठा दिलासा ! पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता 50 ऐवजी 10 रुपये फक्त, जाणून घ्या

पार्ट-ए मध्ये असते ही माहिती
– कंपनीचे नाव आणि पत्ता
– कंपनीचा पॅन नंबर
– कर्मचार्‍याचा पॅन नंबर
– कंपनीचा टीएएन नंबर
– सध्याच्या कंपनीसोबतचा रोजगाराचा कालावधी
– तिमाही आधारावर कापला गेलेला आणि जमा केलेल्या टॅक्सची माहिती, जी कंपनीद्वारे प्रमाणित असते.

पार्ट-बी, पार्ट-ए चा एक पुरक भाग आहे. जर तुम्ही एखाद्या आर्थिक वर्षात आपली नोकरी बदलली, तर हे तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्ही दोन्ही कंपन्यांकडून किंवा शेवटच्या कंपनीकडून फॉर्मचा पार्ट बी प्राप्त करावा.

पार्ट-बी मध्ये असते ही माहिती
– वेतनाची सविस्तर माहिती
– सेक्शन 10 च्या अंतर्गत सवलत प्राप्त भत्त्यांची सविस्तर माहिती
– प्राप्तीकर कायद्यांतर्गत प्राप्त सूट

प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्यासाठी फॉर्म-16 महत्वपूर्ण आहे,
परंतु याचा अर्थ हा नाही की, आयटीआर दाखल करण्यासाठी फॉर्म 16 आवश्यक आहे.
जर तुमच्याकडे फॉर्म-16 नसेल, तरी तुम्ही अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही फॉर्म-16 च्या शिवाय सुद्धा आपला आयटीआर फाईल करू शकता.
जर तुम्ही तुमचा फॉर्म-16 हरवला तर, तुम्ही तुमच्या कंपनीकडे डुप्लिकेटसाठी विनंती करू शकता.
जर तुम्ही एका आर्थिक वर्षात नोकरी बदलली तर प्रत्येक कंपनी रोजगाराच्या कालावधीसाठी फॉर्म-16 चा एक वेगळा पार्ट-ए जारी करेल.

Web Titel : what is form 16 and what is its use know the answer to every question related to it

नियमावलीवरून आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का नाही?’