दर 16 दिवसांमध्ये अंतराळातून येऊ लागलंय ‘सिग्नल’, शास्त्रज्ञ देखील ‘हैराण-परेशान’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शात्रज्ञांनी पहिल्यांदा असा सिग्नल शोधून काढला आहे जो ठराविक वेळेमध्ये वारंवार अवकाशातून पृथ्वीवर येत आहे. अजून याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत परंतु शास्त्रज्ञांनी याचे नाव एफआरबी ठेवले आहे.

काय आहे एफआरबी ?
असे नाही की अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे. या आधी देखील अशा प्रकारचे रहस्यमय रेडिओ सिग्नल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे आता मिळालेला सिग्नल वारंवार ठराविक कालावधी मधून येत आहे. म्हणून याचे नाव फास्ट रेडियो बर्स्ट (एफआरबी) असे ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिग्नल पृथ्वी पासून 500 मिलियन (50 कोटी) प्रकाश वर्ष दूर वरून येत आहे.

कसे झाले परीक्षण ?
कॅनडाच्या सीएचआयएमयच्या शास्त्रज्ञांनी 409 दिवस रेडिओ तरंगावर लक्ष दिले. मिळालेल्या माहितीनुसार हे तरंग अवकाशातून चार दिवस एक तासभर येत होते. त्याचा कालावधी खूप छोटा असतो आणि त्याचे येणे बंद झाल्यानंतर पुन्हा हीच प्रक्रिया बारा दिवसांसाठी पुन्हा सुरु होते.

काय आहे स्रोत ?
शास्त्रज्ञांसाठी अजूनही हे तरंग एक कोडेच आहे. जर याच्या स्रोतांचा तपास लागला तर हे कोठून येत आहेत याचे देखील माहिती मिळेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या स्रोतांमधून हे तरंग येत आहेत.

शात्रज्ञांनी सांगितले की, सुरुवातीला फास्ट रेडियो बर्स्ट तारा किंवा धातूच्या एका छोट्या गॅलेक्सि मधून तरंग आले होते. तर दुसरा तरंग एफआरबी एक वेगळ्या आकाश गंगा सारख्या गोलसर गॅलेक्सि मधून आला होता.