नोकरदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! जाणून घ्या ‘फॉर्म १६’ निगडीत अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्यासाठी कायमच महत्वाचा ठरतो तो फॉर्म-१६. हा फॉर्म नोकरी देणाऱ्या संस्थाकडून देण्यात येतो. हा फॉर्म रिटर्न भरण्यासाठी गरजेचा ठरतो. तसेच यांचा वापर इनकम दाखवण्यासाठी उपयोगी ठरतो. तसेतर हा फॉर्म १६ जून पर्यंत मिळतो, परंतू आता १० जुलैपर्यंत फार्म मिळेल.

तुमचे अधिकार –

1. फॉर्म १६ भरण्याआधी तो आधी वाचून घ्या, जर कामगार फॉर्म १६ भरुन देत नाही तर उद्योजक त्याला दंड ठोठावू शकतो. सेक्शन २७२ नुसार १०० रुपये रोजचा दंड असेल.
2. फॉर्म १६ मध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुम्ही त्याची माहिती उद्योजकाला देऊ शकतात, फॉर्म १६ मध्ये झालेली चूक दुरुस्त करुन मगच रिटर्न फाइल करा. फॉर्म १६ मध्ये पार्ट A आणि B TRACES मधून डाऊनलोड होतो.
3. फॉर्म १६ मध्ये आणि रिटर्नमध्ये कोणताही फरक नको. फॉर्म १६ मिळाल्यावर पॅन नंबर, पगार आणि टॅक्समधील सूटसाठी असलेले पर्यायांची पडताळणी करा. एवढेच नाही तर उद्योजकाच्या पॅन, स्वाक्षरी आणि स्टॅम्पची देखील पडताळणी करा.
4. नव्या गुंतवणूकीची माहिती उद्योजकाला नक्की द्या. उद्योजकाला माहिती दिली नाही तर रिटर्न मध्ये फरक दिसून येईल. नोकरी बदलल्यावर जुन्या आणि नव्या उद्योजकाकडून २ फॉर्म १६ मिळतील. पण २ फॉर्म १६ मिळाल्याने टॅक्स बचत दोनवेळा करता येणार नाही.

काय आहे फॉर्म १६ –

हे एक सर्टिफिकेट आहे. हा फॉर्म कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देते. हा फॉर्म कर्मचाऱ्यांचे पगारातून कापल्या गेलेल्या TDS चे सर्टिफिकेट असते. यावरून हे देखील लक्षात येते की, संस्थेने टीडीएस कापून सरकाराला जमा केला आहे.

फॉर्म १६ आयकर रिटर्न करताना लाभदायक ठरतो. याचा वापर इनकमचा पुरावा म्हणून करता येतो. कर्ज घेताना आणि मंजूर करताना त्याची एक प्रत जोडण्यात येते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.