वजन कमी करण्यासाठी समजून घ्यावी मेटाबॉलिज्म प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मेटाबॉलिज्म या शरीरातील रासायनिक प्रक्रियेत शरीरातील ऊर्जेची विभागणी होते. जगण्यासाठी जेवढ्या ऊर्जेची गरज असते ती सर्व मेटाबॉलिज्मवर अवलंबून असते. या प्रक्रियेमध्ये कॅलरी बर्न होतात. यासाठी वजन कमी करायचे असल्यास ही प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे.

वाढत्या वयाबरोबर शरीराचा मेटाबॉलिज्म रेट कमी कमी होत जातो. हा रेट कमी कमी होत गेला की, व्यक्ती सहजपणे जाडेपणाची शिकार होऊ शकते. पुरूषांमध्ये याचा कालावधी ४० वर्षाच्या आसपास आणि महिलांमध्ये ५० वर्षाच्या जवळपास आहे. प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानेही लहान मुलांमध्ये मेटाबॉलिज्म रेट कमी होतो. ज्यामुळे त्यांचे वजन वाढू लागते. यासाठी फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळले पाहिजे. मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे.

दररोजच्या व्यायामामुळे मेटाबॉलिज्म मजबूत केली जाऊ शकतो. एरोबिक एक्सरसाइजने मेटाबॉलिज्म चांगला होतो. कमी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्मची गती कमी होते, त्यामुळे पाणी भरपूर प्यावे. दोन जेवणामध्ये मोठं अंतर ठेवण्यापेक्षा दो-तीन तासांच्या अंतराने काहीना काही खात रहावे. प्रोटीनयुक्त आहार मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच ग्रीन टीमुळेही मेटाबॉलिज्म वाढतो.