PM मोदींनी दिला नवीन टास्क, जाणून घ्या काय आहे My Life My Yoga स्पर्धा, कसा घेऊ शकणार भाग ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासियांना एक नवीन टास्क दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी योगाला आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी योगासाठी एक स्पर्धा आयोजित केली असल्याचे सांगितले. रविवारी मन की बात दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माय लाइफ, माय योगा स्पर्धेची घोषणा केली. जर तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर..

काय आहे माय योगा स्पर्धा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी योगाविषयी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. लोकांना त्याचे महत्त्व समजले आहे. कोरोनाच्या काळात लोक योग आणि आयुर्वेदाबद्दल बरेच बोलत आहेत. कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाचा योगाच्या प्रती विश्वास अधिक वाढला आहे. ते म्हणाले, आयुष मंत्रालयाने योगास प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. माय लाइफ, माय योगा या नावाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील लोक सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याला आपला व्हिडिओ अपलोड करावा लागेल.

कसा घ्यायचा भाग ?
या योगा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण आपला योग करतानाचा 3 मिनिटांचा व्हिडिओ तयार करा व आयुष मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा. या व्हिडिओमध्ये आपल्याला योग किंवा आसन करताना दाखवले गेले पाहिजे. यासह, आपल्याला योगासह आपल्या जीवनात होणाऱ्या बदलांविषयी सांगावे लागले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना विषाणूचा आपल्या श्वसन प्रणालीवर परिणाम होतो आणि योगाद्वारे आपण आपली श्वासोच्छवासाची प्रणाली बळकट करु शकतो. तसेच आपल्या शरिरातील प्रतिकार शक्ती वाढवू शकतो.

आयुर्वेदाचे विशेष महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना कालावधीमध्ये लोकांना योग आणि आयुर्वेदाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. लोक भारतातील पौराणिक आयुर्वेद स्विकारत आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांनी कधीही योग केला नाही, तर काही जण ऑनलाइन योगा शिकत आहेत. या मार्गांनी आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.