‘पॅनिक’ अटॅकची समस्या ‘कोरोना’ काळात वाढली, जाणून घ्या काय आहे कारण, ‘या’ 6 प्रकारे करा त्या व्यक्तीला मदत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या एकच शब्द अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे आणि तो म्हणजे पॅनिक अटॅक (Panic Attack). मुले, तरूण, वृद्ध सर्वांना पॅनिक अटॅकची समस्या होऊ शकते. कोरोना काळात तर ही प्रकरणे खुपच वाढली आहेत. सध्याच्या स्थितीला घाबरून लोक भितीने पॅनिकचा बळी ठरत आहेत. यापूर्वी पॅनिक अटॅकबाबत इतके ऐकायला मिळत नव्हते. याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार असून ही समस्या झालेल्या व्यक्तीला कोणती मदत करावी, ते जाणून घेवूयात…

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

घाबरणे, भिती किंवा रागाचा एक झटका मानसिक आणि शारीरीक स्थितीला अचानक प्रभावित करतो. हा एखाद्या लाटेसारखा येतो, ज्यामध्ये एखादी गोष्ट किंवा मुद्द्यावरून तणावाच्या स्थितीत व्यक्तीने जाणे म्हणजे पॅनिक अटॅक होय. यात राग येणे, रडत राहाणे, एकट्याने राहाणे इत्यादी हालचाली व्यक्ती करते. एका झटक्याप्रमाणे येऊन हृदय आणि मेंदूवर याचा परिणाम होणे म्हणजे पॅनिक अटॅक होय.

ही आहेत लक्षणे

1 थरथरणे
2 घाबरणे
3 घाम येणे
4 जीव अस्वस्थ होणे
5 अनेकदा छातीत वेदना

पण पॅनिक अटॅकचा हार्ट अटॅकशी संबंध नाही. हा अटॅक काही तासात थांबतो. काहीवेळा याचा परिणाम जास्त सुद्धा राहू शकतो. व्यक्ती लोकांपासून दूर राहाते. मेंदू आणि शरीर दोन्हीवर याचा परिणाम होतो.

हे उपाय करा

1 त्या व्यक्तीला ग्रीन टी पाजा.
2 बदामची पेस्ट त्या व्यक्तीला खाऊ घाला. थोडी साखरसुद्धा टाका.
3 संत्रे खाऊ घाला.
4 अशा व्यक्तीसोबत सकारात्मक बोलत रहा.
5 त्या व्यक्तीच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करा. शांत करण्याचा प्रयत्न करा.
6 अशा व्यक्तीशी सहानुभूतीपूर्व वागा. तिचे नकारात्मक विचार विसरण्यासारखे काही बोला.