रिलायन्स ‘JioFiber’चं कनेक्शन हवंय ? असं करा बुकिंग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील महिन्यात रिलायन्स जिओ फायबरची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार गुरूवारी जिओ फायबर सेवेचं कमर्शिअल लाँचिंग करण्यात आलं आहे. रिलायन्सने जिओ फायबर अंतर्गत 6 वेगवेगळ्या शुल्क योजना सुरू केल्या आहेत.

699 रुपयांपासून योजना सुरू
या सर्व योजना दरमहा 699 रुपयांपासून ते 8499 रुपयांपर्यंत असतील. जिओ फायबर ब्रॉडबँड सेवा एकूण 1600 शहरांमध्ये उपलब्ध आहेत. दर योजनेनुसार, आपल्याला 100Mbps ते 1Gbps पर्यंत वेग मिळेल. शिवाय 4K सेट टॅप बाॅक्स, दूरचित्रवाणी संच, ओटीटी अ‍ॅप आदींचीही जोड निवडक योजना पर्यायांवर आहे. या व्यतिरिक्त आपण वार्षिक प्लॅन सब्सक्राइब केल्यास केबल टीव्ही कनेक्शनसाठी तुम्हाला 5000 रुपयांचे मोफत लाइव्ह होम गेटवे मिळेल, तसेच 4k चा सेट टॉप बॉक्स सुमारे 6400 रुपयांना मिळेल. आपण निवडलेल्या वार्षिक प्लॅननुसार, आपल्याला 24 इंच ते 32 इंच एचडी किंवा 43 इंच एचडीचा 4K टीव्ही देखील मिळेल.

अशी मिळवा जियो फाइबर सर्विस –
www.jio.com वेबसाईटवर जा किंवा MyJio अ‍ॅप डाउनलोड करा.

जियो फाइबर सर्विससाठी नोंदणी करा.

आपल्या क्षेत्रात थेट फायबर उपलब्ध असल्यास सेवा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधेल.

मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक योजनेसह रिचार्ज केल्यावर प्रत्येक जियो फायबर वापरकर्त्यास सेट टॉप बॉक्स मिळेल.

लँडलाईन मिळणार फ्री
या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना संपूर्ण लँडलाइन फोन कनेक्शनसह विनामूल्य अमर्यादित व्हॉईस कॉल देखील मिळतील. ही सेवा वापरल्यास, वापरकर्ते देशामध्ये विनामूल्य कॉल आणि परवडणार्‍या किंमतीवर आंतरराष्ट्रीय कॉल करण्याचा लाभ घेऊ शकतील.

इतर सुविधा
याशिवाय जिओ फायबर कडून तुम्हाला मोफत होम व्हॉईस कॉलिंग, कॉन्फरन्सिंग आणि इंटरनॅशनल कॉलिंग, टीव्ही व्हिडिओ कॉलिंग आणि कॉन्फरन्सिंग, एंटरटेनमेंट ओटीटी अ‍ॅप्स, गेमिंग, होम नेटवर्किंग, डिव्हाइस सिक्युरिटी, व्हर्च्युअल रिअलिटी अनुभव, प्रीमियम कंटेंट प्लॅटफॉर्म यासारख्या सुविधा देखील मिळतील.

 

You might also like