#Surgicalstrike2 : पाकिस्तानवर हल्ला करणाऱ्या ‘मिराज’ विमानाची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथील हल्ल्याला भारतीय हवाई दलाने उत्तर दिले आहे. त्यामुळे सध्या देशात हावाई दलाने वापर केलेल्या विमानाचे नाव सर्व भारतीयांच्या तोंडात आहे. ‘मिराज २०००’ असं या विमानाचे नाव आहे. मिराजचे भारतीय नाव ‘वज्र’ असे आहे. भारताने आपल्या शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला या वज्राने घेतला आहे. भारताच्या या वज्राची माहिती जाणून घेण्यास प्रत्येक भारतीय उत्सुक आहेच.

‘मिराज’ ही लाढाऊ फायटर विमानं आहेत. १९७० साली मिराजचे डिझाईन तयार करण्यात आले होते. मिराज फ्रेंच बनावटीचे विमान आहे. फ्रेंच एअर फोर्समध्ये वापरली जातात.

Dassault Aviation या कंपनीने ही विमान तयार केली आहेत. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. फ्रेंच एअर फोर्सच्या व्यतिरिक्त भारत, चायना युनायटेड अरब इमिरेट्स या देशातही या विमानांचा वापर करण्यात येतो.
मिराज हे विमान वायू सेनेचे प्रायमरी विमान आहे.  हे विमान शत्रूंच्या इलाक्यात लेजर गायडेड बॉम्बने हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

सध्या  भारतीय सेनेकडे 51 मिराज विमान आहेत. १९८५ मध्ये मिराज भारतीय सेनेमध्ये सामील झाले. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ओझर येथे असणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे बनवण्यात येते. त्यामुळे विमान बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचेही लोकांकडून अभिनंदन केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच 

निवांत झोपा सांगून स्वतःच झोपले ; नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची फिरकी

भारताचा पाकवर एअर स्ट्राइक : २१ मिनिटे सुरु होता हल्ला 

पाकिस्तानच्या मंत्रालयात तातडीची बैठक सुरु

पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न 

‘या’ 10 हून अधिक जागांवर भारतीय हवाई दलाने केला हल्ला 

भारत कमजोर देश नाही : मुख्यमंत्री