खुशखबर ! ‘उच्चांकी’वरून 5547 रूपयांनी स्वस्त झालं सोनं, आगामी दिवसात ‘या’ कारणामुळं दरात घसरण होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमामेच देशांतर्गत सोन्याचे दर सतत कमी होत आहे. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या विक्रीवर दबाव पहायला मिळाला. MCX वर डिसेंबरच्या डिलिव्हरीचे सोने 50 हजार 653 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. तर चांदीची वायदा किंमत कमी होऊन 61 हजार 512 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार शनिवार (दि.17) पासून सुरु होणाऱ्या नवरात्रापासून देशात फेस्टिव्ह सीझन सुरु होत असल्याने सोन्याची मागणी वाढू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये तेजी कायम असल्याने देशांतर्गत बाजारत देखील सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात.

सोने 5547 रुपयांनी स्वस्त
ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदी 80 हजार रुपये प्रति किलोग्रामच्या आसपास पोहोचली होती. त्यानंतर आतापर्यंत सोन्याचे दर 5547 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत तर चांदीचे दर 18 हजार 488 हजार रुपये प्रति किलोग्रामने कमी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात उतरल्या किंमती
विदेशी बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये कमी आल्याने स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्याने कमी होऊन 1906.39 डॉलर प्रति औंस झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या किमतीमध्ये दोन टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 0.2 टक्क्याने घट झाली असून चांदी 24.26 डॉलर प्रति औंस झाले आहे. त्याचप्रमाणे प्लॅटिनमचे दर 0.2 टक्क्याने वाढून 866.05 डॉलर झाले आहेत.

सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता
7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे दर सराफा बाजारात 56 हजार 254 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. तर चांदीचे दर देखील 76 हजार 008 रुपये प्रति कोलोवर पोहचले होते. सोन्याच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अनेक देश त्यांची अर्थव्यवस्था मजबुत करण्याच्या प्रयत्नात आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षापर्यंत डॉलरमधील मजबुतीबरोबरच सोन्याच्या किंमतीत अचानक तेजी येऊ शकते.

सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढण्याचा अंदाज आहे. कारण अमेरिकेत लवकरच निवडणुका होणार आहेत. यामुळे डॉलरमध्ये तेजी कायम राहील. भारतात 17 ऑक्टोबरला नवरात्रीपासून फेस्टिव्ह सीझनला देखील सुरु होत असल्याने देशात स्पॉट गोल्डची मागणी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.