तुम्ही ग्लासऐवजी बाटलीने पाणी पिता का? जाणून घ्या नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – पाणी (Water) हेच जीवन आहे, असे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी शरीरात पाणी (Water) असणे खूप महत्वाचे आहे. जास्त घाम आल्याने उन्हाळ्यात डिहाइड्रेशन होऊ शकते. यामुळे बर्याच समस्या उद्भवू शकतात. शरीरात बॅक्टेरिया, व्हायरससारखे संक्रमण असले तरीही डॉक्टर जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगतात. आता असा प्रश्न पडतो पाणी पिण्याचा योग्य किंवा चुकीचा मार्ग आहे का ? हे तुम्ही घराच्या वडीलधाऱ्याकडून कित्येकदा ऐकलं असेल. अशा काही टिप्स आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
बसून पाणी प्या
असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नसले तरी आयुर्वेदात असे मानले जाते की उभे राहून पाणी पिल्यास नुकसान होऊ शकते. जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा शरीरातील द्रवपदार्थाचे संतुलन बिघडते.जेव्हा हे घडते तेव्हा काही समस्या समस्या उद्भवू शकतात. पण डॉक्टर यावर सहमत नाहीत.
ग्लासने पाणी प्या
बरेचदा लोक बाटलीमधून थेट पाणी पितात. बाटलीतून पाणी पिणे योग्य नाही. आपण नेहमी एका ग्लासने घोट घोट पाणी प्यावे. यामागचे एक कारण असे आहे की जेव्हा आपण बाटलीमधून थेट पाणी पितो, तेव्हा ते एक किंवा दोन घोटामध्ये घसा ओलसर होतो आणि आपण कमी पाणी पितो. जर आपण एका ग्लासमध्ये पाणी घेऊन पिले तर आपण संपूर्ण ग्लास समाप्त करू शकता आणि अधिक पाणी शरीरात पोचले. पाण्याचा एक छोटासा घोट घ्या आणि नंतर श्वास घ्या. आयुर्वेदात हा पाणी पिण्याचा योग्य मार्ग मानला जातो.
Pune : दुर्देवी ! बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही कोरोनाने मृत्यू
जास्त थंड पाणी पिऊ नका
खूप थंड पाणी पिल्यामुळे आपल्या पचन प्रक्रियेस त्रास होतो. कोमट पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. पाणी जास्त थंड किंवा जास्त गरम नसावे. जेव्हा आपल्याला तहान लागेल तेव्हा पाणी प्या. दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिण्याचे लक्षात ठेवा.
Machar Che Upay : मच्छारांच्या उपद्रवाने त्रस्त झाला आहात का? घरात लावा ‘ही’ झाडे, चुकूनही फिरकणार नाही जवळपास
Maratha Reservation : अशोक चव्हाणांचा सवाल, म्हणाले – ‘EWS प्रमाणेच मराठा आरक्षणाला घटनादुरुस्तीचे संरक्षण का मिळत नाही?’
शरीरात ‘या’ समस्या असतील तर चुकून देखील खाऊ नका वांगी, होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या