अाता हे काय… बायको सोशल मीडियावरचं असते म्हणून; नवऱ्याने केली चक्क घटस्फोटाची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सगळी कडे सध्या सोशल मीडियाचे वारे बघायला मिळत आहे. सोशल मीडियाने सर्वांनाच जणुकाही वेळ लावले आहे. मात्र याच सोशल मीडियाचा वापर अती होताना दिसुन येतो अाहे. त्यामुळे याचे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत. असीच एक घटना दिल्ली मध्ये बघायला मिळत आहे. यामध्ये बायको सोशल मीडीयाचा अती वापर करते म्हणून तिच्या नवऱ्याने चक्क घटस्फोटाची मागणी केली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5826d279-7bbb-11e8-a917-b99c9dc769b5′]

नरेंद्र सिंग असे याचिकाकर्त्याचे नाव असून, दिल्लीतील कोैटुंबिक न्यायालयात त्याने ही अनोखी याचीका दाखल केली आहे. यामध्ये माझी बायको सोशल मीडिया अॅडिक्ट झाली आहे. तिला त्याचे व्यसनच लागले आहे, त्यामुळे मला घटस्फोट मिळावा असा अर्ज केला आहे. दरम्यान माझ्या पत्नीला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिला व्हर्च्युअल वर्ल्डच आवडते, असेही या याचिकेत म्हटले आहे.

पत्नी रात्रभर व्हॉट्सअॅपवर चॅट करत बसते आणि सोशल मीडियावरचे अपडेट चेक करत असते. त्याचा मला त्रास होतो. आमचे लग्न होऊन वर्षही पूर्ण व्हायचे आहे, मात्र लग्न झाल्यापासूनच माझ्या पत्नीला सोशल मीडियाच आवडते तिला संवाद साधण्यात काही रस नाही. माझी पत्नी तिच्या मित्रांशी व्हॉट्सअॅपवरून चॅट करत असते मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काही आपले चॅट्स थांबवण्यास तयार नाही उलट तिने मलाच धमकावले असेही नरेंद्र सिंगने म्हटले आहे.
[amazon_link asins=’B01F073VWQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d9d22f5-7bbb-11e8-a50b-99b7c5dc2293′]

सिंग यांच्या पत्नीच्या वकिलाने हे आरोप फेटाळले असून, कोर्टाने या दोघांनाही विचार करण्यासाठी जुलै महिन्याची मुदत दिली आहे.

हल्लीच्या काळात सोशल मीडियाचा तरुणांवरचा प्रभाव वाढला आहे. सोशल मीडियावर अपडेट्स टाकण्याच्या नादात आणि व्हर्चुअल जग खरे वाटू लागल्याने अनेक जोडप्यांमध्ये संवादच नसल्याची समस्या बघायला मिळते. त्यातून अशा घटना समोर येतात असे मत दिल्लीतील समुपदेशक पूजा मेहता यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत अशा अनेक घटना समोर आल्याचेही त्या म्हटल्या आहेत.