‘अदनान’ला इतके ‘लिफ्ट’ करायचे कारण काय ? ‘सामीला’ पद्यश्री देण्यास मनसेचा विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुळ पाकिस्तानी असलेल्या गायक अदनान सामीला पद्यश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या पद्यश्री देण्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणाताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेचे ठाम मत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्यश्री पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यात ११८ जणांना पद्यश्री, १६ जणांना पद्यभूषण आणि ७ जणांना पद्यविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यात मुळ पाकिस्तानी गायक आदनान सामीलाही पद्यश्री जाहीर करण्यात आला आहे. आदनान सामी हा हिंदी चित्रपटात गायक म्हणून आपली कारकिर्द घडविण्यासाठी मुंबईत आला. त्याचे ‘लिफ्ट करा दे’ हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन अनेकदा शिवसेना, भाजपा कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात काँग्रेस आघाडी सरकार असताना आंदोलने केली. असे असताना ४ वर्षापूर्वी मोदी सरकारने त्याला भारतीय नागरिकत्व दिले आहे.

चार वर्षात अशी काय अदनान सामी याने कामगिरी केली की त्याला थेट भारत सरकारने पद्यश्री पुरस्कार द्यावा, अशी टिका आता सुरु झाली आहे. सामी हा पूर्वी त्याच्या अवाढव्य शरीरामुळे टिकेचा विषय झाला होता. मात्र, गेल्या काही वर्षात त्याने आपले वजन कमी केले असून आता तो एकदम सडपातळ दिसतो.  अदनान सामी याची पहिली पत्नी झेबा बख्यियार व सामी याचा मुलगा अझान हा संगीतकार आहे. सध्या तो पाकिस्तानात राहतो. मी भारतात जरी वाढलो असलो तरी पाकिस्तान हेच माझे घर आहे, असे त्याचे म्हणणे आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करुन सामी याला पद्यश्री देण्याला विरोध केला आहे. मुळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ  नये, हे मनसेचे ठाम मत आहे. २०१५  मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढे लिफ्ट करण्याचे कारण काय?, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like