नोटांवरील महात्मा गांधीचा फोटो काय संदेश देतो ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  जयंतीचा उत्साह आहे. आपल्या देशात असंख्य महापुरुष झाले पण भारतीय रुपयांच्या चलनाच्या नोटांवर केवळ महात्मा गांधी यांचाच फोटो असतो. नोटांवर गांधीजीचाच फोटो दिसतो. याचे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर  इथे २ आॅक्टोंबर १८६९ रोजी झाला. सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाºयाला विनम्र आदरांजली वाहत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’abd4c5da-c60e-11e8-b860-99410097fce7′]
भारतीय नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो आपण सर्वांनी पाहिला आहे. मात्र नोटांवर केवळ गांधीजींचाच फोटो का ? याबाबत अनेकदा विचारले जाते. देशात असंख्य महापुरुष झाले, पण केवळ गांधीजींच नोटेवर दिसतात.
भारतीय चलनाची जगात खास प्रतिष्ठा आहे. जगातील निवडक देशांच्या चलनावर विश्वास ठेवला जातो, त्यामध्ये भारताचा नंबर लागतो. जवळपास प्रत्येक देशाच्या चलनावर कोणत्या ना कोणत्या महापुरुषाचा फोटो असतो. हा फोटो त्या त्या देशाच्या प्रतिमेचे प्रतिनिधीत्व करतो.  सत्य आणि अहिंसा ही शिकवण जगाला भारताने दिली. महात्मा गांधी या दोन तत्वासाठी जगभर ओळखले जातात. म्हणूनच भारतीय चलन रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो असतो.
[amazon_link asins=’B075MHBDN4,B019XSHB7O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c601ab58-c60e-11e8-a352-f51423769cb0′]
मात्र भारतीय नोटांवर पहिल्यापासून गांधीजींचाच फोटो होता असे नाही. रिझर्व्ह बँकेने सर्व भारतीय रुपयांवर १९९६पासून महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा बाजारात आणल्या. १९९६ मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटांना गांधी सीरिजचे नाव देण्यात आले.
त्याआधी १९६९ मध्ये आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो असलेली नोट जारी केली होती. गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यावेळी गांधीजींचा फोटो असलेल्या छोट्या रकमेच्या नोटा आणल्या होत्या.
नोटांवर दिसणारा गांधीजींचा फोटो हा तत्कालिन भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी लॉर्ड फ्रेडरिक पॅथिक लॉरेंन्स यांच्यासोबत १९४६ मध्ये झालेल्या भेटीदरम्यानचा आहे. प्रसिद्ध फोटोग्राफरने तो फोटो काढल्याची चर्चा आहे, पण तो फोटोग्राफर कोण हे अद्याप समजलेले नाही. या फोटोतील केवळ गांधीजींचा चेहरा नोटांवर छापण्यात आला. सौम्यपणे हसणारे गांधीजी भारतीय नोटांवर दिसतात.
[amazon_link asins=’B01HQ4O058,B00ZR9C9Q2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dd89fe30-c60e-11e8-bae9-e537530859d9′]
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय नोटांवर कोणत्याही भारतीय व्यक्तींचा फोटो नव्हता. भारत पारतंत्र्यात असल्याने कोणाचाही फोटो नव्हता. त्यावेळी नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो होता. भारत १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला आणि तेव्हापासून नोटांवर ब्रिटनच्या महाराणीचा फोटो छापणं बंद झालं.
भारतीय नोटेवर देशातील विविधतेचं दर्शन आहे. प्रत्येक मैलावर बदलणाºया भाषांना नोटांवर स्थान देण्यात आलं आहे. देशातील १५ भाषांमध्ये त्या त्या नोटेचे मूल्य लिहिलेले असते.
जाहिरात