लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं आणि भाज्या फायदेशीर, ‘हे’ 6 महत्वाचे मुद्दे जाणून घ्या

पीएलओएस मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मोड आलेलं कडधान्य, ब्रोकली अशा नॉन स्टार्ची भाज्या लाभदायक ठरतात. तसेच बेरीज, सफरचंद आणि पेर आदी फळं सुद्धा गुणकारी आहेत. वजन कमी करण्यासाठी फळं जास्त लाभदायक ठरतात. यासंदर्भातील रिसर्चमध्ये सांगितलेले महत्वाचे मुद्दे जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा
1 स्मूदी वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असते. यात अनेक प्रकारची फळं आणि अधिक प्रमाणात फायबर असतं.
2 रोज सफरचंद आणि पेर खाल्ल्यास जास्तीत जास्त वजन कमी होतं.
3 वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये सोया, टोफू, फ्लॉवर आणि पालकाचा समावेश करा.
4 फळं खाल्ल्याने भूक कमी लागते आणि दिवसभर पोट भरलेलं राहते.
5 डबाबंद फूडचं सेवन पूर्णपणे बंद करा.
6 वजन कमी करण्यासाठी आहारात भाज्या आणि फळं दोन्हींचा समावेश करा.