सतत बसून बसून वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी फळं जास्त फायदेशीर की भाज्या ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ज्या लोकांना वजन कमी करायचं असतं असे लोक हेल्दी डाएट घेतात. फळं आणि भाज्या वजन कमी करण्यासाठी बॅलन्स्ड डाएट मानला जातो. अनेक लोक आहारात फळं आणि भाज्यांचा अधिकाधिक समावेश करतात. परंतु यापैकी जर एकाची निवड करायची झाली तर खूप कठिण असतं. फळं आणि भाज्या यांचे अनेक फायदे होतात. दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. तसं पाहिलं तर फळं आणि भाज्या यांची न्युट्रीशन व्हॅल्यु आणि त्यातील कॅलरीज समान असतात. परंतु अनेकांना असा प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी फळं अधिक खावीत की, भाज्या. आज याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पीएलओएस मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर कडधान्ये, ब्रोकोली अशा नॉन स्टार्ची भाज्यांचं सेवन करणं जास्त फायदेशीर ठरतं. परंतु बेरी, सफरचंद आणि पेर सारखी फळं खाणंही उत्तम मानलं जातं. जर वजन कमी करायचं असेल तर फळांचा जास्त फायदा होतो. रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, स्मूदी वजन कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर असते. यात अनेक प्रकारच्या फळांसह फायबरचं प्रमाणही जास्त असतं. जर तुम्ही रोज सफरचंद आणि पेराचं सेवन केलं तर जास्तीत जास्त वजन कमी होतं. परंतु जर तुम्ही भाज्यांचे शौकीन असाल किंवा तुम्हाला भाज्या जास्त आवडत असतील आणि जर वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये सोया, टोफू, फ्लॉवर आणि पालकाचा समावेश करा.

रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर भाज्यांच्या तुलनेत तुम्हाला फळांचा जास्त फायदा होतो. याशिवाय फळं सहजपणे पचतात. म्हणून तुम्ही डाएटमध्ये याचा समावेश करायला हवा. फळांमध्ये हेल्दी कॅलरीज आणि अधिक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. फळं खाल्ल्याचा फायदा असा होतो की, पोट भरलेलं राहतं, यामुळं भूक कमी लागते. युनिव्हर्सिटी ऑफ लंडननुसार, जर तुम्ही डबाबंद फूडचं जास्त सेवन करत असाल तर यामुळं अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. रिसर्चमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, अरोग्याशी संबंधित समस्यांपासून वाचण्यासाठी फळांच्या तुलनेत भाज्यांचं सेवन करणं जास्त फायदेशीर ठरतं. परंतु याचा अर्थ असा नाही की, फळं आरोग्यासाठी हानिकारक आहेत. तुम्हाला वजन जरी कमी करायचं असेल तरीही तुम्ही फळं आणि भाज्या असा दोन्हींचा डाएटमध्ये समावेश करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.