TV ची ‘नागिन’ निया शर्मा लग्न करणार ? शेअर केली खास ‘टीप’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नागिन 4 मालिकेतील अभिनेत्री निया शर्मानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यानंतर आता नियाच्या लग्नाबद्दल अंदाज लावले जाताना दिसत आहेत. निया शर्माच्या या नव्या पोस्ट चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. यात अनेकांनी तिच्या लग्नाबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. नियानं नेमकं काय पोस्ट केलं आहे जाणून घेऊयात.

निया शर्मा करतेय लग्नाचा विचार ?

नियानं नुकतीच आपल्या इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं एक इमेज शेअर केली आहे यावर लिहिलं आहे की, “लोक लग्नाआधीच एसीच्या टेंपरेचरबद्दल का बोलत असतात.” ही इमेज शेअर करताना कॅप्शनमध्ये निया म्हणते, गरजेच्या गोष्टी. नियानं लग्नाबद्दल शेअर केलेली पोस्ट चाहत्यांनाही आवडली आहे.

https://www.instagram.com/p/B8vc5PUlgvP/

काही चाहते असेही आहेत ज्यांनी नियाच्या लग्नाबद्दल अंदाज लावायला सुरुवात केली आहे. नियाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, याचा अर्थ असा आहे का, तू लग्न करणार आहेस ? काहींनी यावर कमेंट केली आहे की, एकदम बरोबर सल्ला. एकानं म्हटलं आहे बरोबर आहे तुझं.

https://www.instagram.com/p/B8YNXfJl4Qi/

नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या निया नागिन 4 मालिकेत लिड रोल साकारत आहे. निया पहिल्यांदाच सुपरनॅचरल शो करताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिची अ‍ॅक्टींग आवडत आहे.

https://www.instagram.com/p/B7DOlCvFsrn/