स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. घरात पाच-सहा सद्य असले तरी प्रत्येकजण स्माटफोनमध्ये रममरण झालेला दिसतो. कुणीही एकमेकांशी बोलत नाही. अनेक घरांमध्ये सध्या असे चित्र कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. विशेषता तरूणाईला स्मार्टफोनने प्रचंड वेड लावले आहे. सारखे-सारखे आपल्या स्मार्ट फोनवर काही अपडेट आल्या आहेत, का हे पहाणारे अनेक महाभाग आपल्याला रस्तोरस्ती दिसतात. सोशल मीडियाच्या अभासी दुनियेत हजारो तरूण स्वतःला हरवून बसले आहेत. अशाच प्रकारच्या अनेक गॅझेटने अशरक्षा तरूणाईला व्यसन लावले आहे. हेच व्यसन जेव्हा एखाद्या मानसिक आजारात बदलते तेव्हा ते त्रासदायक ठरते.

गरज म्हणून तंत्रज्ञानाचा वापर आपल्या कामासाठी करणे चांगलेच आहे. पण केवळ टाईपास करण्याच्या नादात नव्या गॅझेटच्या व्यसनाची जागा आता मानसिक आजाराने घेतली आहे. यामुळेच तरूणाई नोमोफोबिया नावाच्या आजाराने ग्रस्त होत आहे. जवळपास तीन पिढ्या सतत एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर करत आहेत. ९० टक्के दिवस या उपकरणांसोबतच हे लोक घालवत असलयाचे, एडोबमधील एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार ५० टक्के वापरकर्ते मोबाइलवर काम सुरू करतात आणि लगेच कंम्युटर स्क्रिनसोमर जाउन बसतात. भारतामध्ये अशाप्रकारे काही वेळातच स्क्रिन स्विच करणे एक साधारण गोष्ट आहे. मोबाइल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणे, डोळे कोरडे होणे, कंप्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचा त्रास होतो.

० ते ३० वर्षांच्या वयोगटातील जवळपास ६० टक्के तरूणांना मोबाइल फोन विसरण्याची भिती असते. यालाच नोमोफोबिया असे म्हणतात. ३० टक्के प्रकरणांमध्ये स्मार्टफोन मुलांसाठी संघर्षाचे कारण ठरतात. अनेकद मुले उशीरा उठतात आणि त्यामुळे कधी कधी शाळेला सुट्टी देखील घेतात. अनेक लोक रात्री झोपायला गेल्यानंतर अंथरूणातच ३० ते ६० मिनिटांचा वेळ मोबाइलवर घालवतात.

असा ओळखा नोमोफोबिया
फोनच्या वापरामुळे वेळ वाया जात असेल.
वागण्या-बोल्यामध्ये अस्वस्थता
स्मार्टफोनपासून दूर झाल्यास अस्वस्थता येणे
झोप बिघडणे, झोप होणे, सतत झोपमोड

अशी सोडवा स्मार्टफोनची सवय
झोपण्यापुर्वी एक तासभर आधी तरी फोन बंद करा
व्हायब्रेशन्स, ब्लिंक लाइटस बंद करा
प्रत्येक तीन महिन्यांमधून ७ दिवसांसाठी फेसबुकचा वापर करू नका
गरज नसेल तर रात्रभर फोन बंद ठेवा, चांगले-वाईट जगात घडले तर ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे
फिरायला जा, खेळा, व्यायाम करा
आठवड्यातून एखादा दिवस सोशल मीडियापासून दूर राहा
घरातून बाहेर असतानाच मोबाइलचा वापर करा
घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा
वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरू नका
लहान मुलांपासून फोन दूर ठेवा
नवे छंद किंवा नवी आवड जोपासा
वाचन, बागकाम, घरकाम करा
घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वत: जाऊन बोला, चॅटिंगचा वापर टाळा
एका दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका
अर्थ तंत्रज्ञानाचा समजुतदारपणाने उपयोग करा

फेसबुक पेज लाईक करा –