काँग्रेससमोर मोठा पेच ! ‘या’ 2 दिग्गजांचे मंत्रिमंडळातील स्थान काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकासआघाडीच्या नेतृत्वात ठाकरे सरकार स्थापन झालं आहे. परंतु अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार मात्र झालेला नाही. नेत्यांची मंत्रिपदंही अद्याप ठरलेली नाही. काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रिपद द्यायचं हा मोठा प्रश्न काँग्रेससमोर आहे.

अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदं भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं कोणतं मंत्रिपद द्यायचं हा पेच काँग्रेससमोर आहे असे समजत आहे. दरम्यान दिल्लीतून मात्र पृथ्वीराज चव्हाणांना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी दोन्ही नेत्यांचं महाविकासआघाडीत काय स्थान आहे याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे असे दिसत आहे. उभय नेते काँग्रेस कार्यकारिणीतील वरिष्ठ नेते आहेत.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचं सरकार स्थापन झालं आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी जरी लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असले तरी मित्रपक्षांशी जुळवून घेणं हा त्यांच्यासाठी नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि सोबतच प्रशासकीय अनुभव आणि संघटन कौशल्य याचा विचार करता अशोक चव्हाणांचं पारडं काही प्रमाणात जड दिसत आहे.

दोन्ही नेत्यांना मंत्रिपद मिळतं की, एकाच नेत्याला मंत्रिपद मिळतं किंवा मग जर कोणत्याही एका चव्हाणांना जर मंत्रिपद मिळत असेल तर कोणाला संधी मिळते हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like