धुळीच्या संपर्कात येताच जोरजोरात शिंका येतात ? ‘हे’ अ‍ॅलर्जीचं नेमकं कारण ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेव्हा धुळीचे कण श्वासांद्वारे शरीरात जातात तेव्हा इम्युनिटी वाढते आणि शरीर नुकसानकारक पदार्थांविरोधात अँटीबॉडीज तयार करतं. शरीराची ही प्रक्रिया अ‍ॅलर्जीला कारणीभूत ठरते. यामुळंच शिंका येतात किंवा नाक वाहू लागतं. अ‍ॅलर्जीच्या लक्षणांव्यतिरीक्त धुळीच्या संपर्कात आल्यानंतर सायनस इंफेक्शन आणि अस्थमा होऊ शकतो. आज आपण अॅलर्जीचं कारण, त्यावर उपाय आण यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत.

काय आहेत अ‍ॅलर्जीची लक्षणं ?

धुळीची अ‍ॅलर्जी ही एक सामान्य बाब आहे. या अ‍ॅलर्जीला डस्ट माईट अ‍ॅलर्जी असंही म्हणतात. अनेकांना ही समस्या असते. याची काही लक्षणं पुढीलप्रमाणे-

–  धुळीच्या संपर्कात आल्यानंतर नाक वाहतं आणि नाकाला खाज येते.

–  त्वचेवर खाज येते

–  चेहऱ्यावर वेदना होऊ शकतात.

–  डोळ्यांना खाज येणे, पाणी येणे आणि डोळे लाल होणे

–  घशात खवखव होणे आणि खोकला येणं

–  डोळ्यांना सूजही येऊ शकते. डोळ्याच्या खालच्या बाजूला चट्टे येणं

–  श्वास घेण्यास त्रास होणे

–  बोलण्यास अडचण निर्माण होणे

धुळीच्या अ‍ॅलर्जीचं कारण – धुळीमुळं होणारी अ‍ॅलर्जी ही नुकसानकारक पदार्थांसाठी इम्युनिटी सिस्टीमची एक प्रतिक्रिया आहे. ज्या पदार्थांमुळं शरीर ही प्रतिक्रिया देतं त्याला अ‍ॅलर्जी असं म्हणतात. यापैकीच एक म्हणजेच धुळीचे कण. घर कितीही स्वच्छ असलं तरीही तिथं धुळीचे कण असतात. तुम्ही जेवढे जास्त धुळीच्या संपर्कात येता तुमचं शरीर तेवढीच जास्त प्रतिक्रिया देतं. म्हणून शक्य तेवढं धुळीपासून दूर रहा आणि काळजी घ्या.

काय आहे यावर उपाय ?

यावर एकच सर्वात उत्तम आहे तो म्हणजे शक्य तेवढा धुळीचा संपर्क टाळणं. असं करूनही जर फरक पडला नाही तर डॉक्टांसोबत संपर्क साधावा.

काय काळजी घ्याल ?

–  धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी ह्युमिडिटी 30 आणि 50 टक्क्या दरम्यान ठेवण्यासाठी एअर कंडीशन किंवा ह्युमिडिटीफायरचा वापर करा.

–  चांगल्या क्वालिटीचं एअर फिल्टर वापरा.

–  धुता येतील अशी खेळणी खरेदी करा आणि वेळोवेळी धुवून घ्या.

–  अ‍ॅलर्जीपासून वाचण्यासाठी उशीचा कवर वेळोवेळी धुवावा.

–  वेळोवेळी घराची स्वच्छता करा. यामुळं धूळ दूर होईल आणि अ‍ॅलर्जी पासून तुमचा बचाव होईल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.