Photos : रिंकू राजगुरूच्या Instagram स्टोरीची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ ! दिली ‘ही’ हिंट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सैराटमधून सर्वांच्या मनात घर करणारी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडीयावर सतत अ‍ॅक्टीव असते. रिंकु सोशल मीडियावरून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकत्याच तिनं तिच्या इंस्टा स्टोरीला काही पोस्ट शेअर केल्या आहेत ज्यामुळं ती पुन्हा चर्चेत आली आहे.

रिंकुनं तिच्या इंस्टा स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिनं सांगितलं आहे की, तिनं शुटींगला सुरुवात केली आहे. रविवारी दि. 21 मार्च रोजी तिनं हा फोटो शेअर केला होता. दुसऱ्या दिवशी तिनं तिच्या स्टोरीला एक बूमरँग व्हिडीओ शेअर करत शुटींगचा दुसरा दिवस असल्याचं सांगितलं आहे.

रिंकुच्या स्टोरीवरून ती शुटींग करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रोजेक्टची शुटींग ती करत आहे हे काही अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या तिच्या इंस्टा स्टोरीची चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CMThg68Jq_V/

रिंकुचा हा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

रिंकुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती छूमंतर या आगामी सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती झुंड या हिंदी सिनेमातही काम करणार आहे. तिच्या लुकचं पोस्टरही रिलीज झालं आहे. नुकताच तिचा अनपॉज्ड हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे. यात 5 लघुपट आहेत. यातील रॅट ए टॅट मध्ये रिंकु दिसली होती. काही दिवसांपूर्वीच ती हंड्रेड वेब सीरिजमध्ये दिसली आहे. तिनं मेकअप, कागर अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/CIw-qocJu4R/