Oxygen level in Corona : शरीरात ऑक्सिजन लेव्हल किती असायला हवी? असे ओळखा O2 कमी होतोय की नाही

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.

ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल कमी होणे. यादरम्यान श्वास घेण्यास अडचणी आणि ऑक्सिजन लेव्हलमध्ये कमी ही एक समस्या आहे. मात्र, हा त्रास जाणवू लागला म्हणजे लगेच रुग्णालयात दाखल करणे गरजेचेच असते असे नाही. एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात जेव्हा दाखल केले जाते तेव्हा त्याची ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल एकदम कमी असेल.

ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे काय?

ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे लंग्जनुसार शरीरातील दुसऱ्या अवयवांना पाठवून रक्तात ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिनची कमी होणे. ज्या व्यक्तीची ही लेव्हल 94 च्या वर असेल ती व्यक्ती निरोगी समजली जाते.

ऑक्सिजन लेव्हल किती असावी?

जर SpO2 लेव्हल 94-100 च्या दरम्यान असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती निरोगी आहे. जर रिडिंग 94 च्या खाली गेली तर हायपोक्सेमियाची समस्या उद्भवू शकते. जर रिडींग 90 पेक्षाखाली गेले तर समजून जावा तुम्हाला मेडिकल ट्रिटमेंटची गरज आहे.

ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याची लक्षणे काय?

श्वास घेण्यास अडचण आणि छातीत दुखणे यांसारखी सर्व ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याची लक्षणे आहेत. काही रुग्णांच्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये कमी, शरीरातील अवयवात प्रभाव यांसारखी गोष्ट दिसते. हे एक तुम्हाला धोकादायक स्थितीचे संकेत देत असते.

ऑक्सिजन लेव्हल 91 वर गेली तर…

जर कोणत्याही व्यक्तीची ऑक्सिजन लेव्हल 91 झाली तर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ऑक्सिजन थेरपी आणि प्रोन ब्रीदिंगच्या माध्यमातून लेव्हल सुधारता येऊ शकते. मात्र, जर ऑक्सिजन लेव्हल एक-दोन तासांत खाली-वर जात असेल किंवा एकाच स्तरावर असेल तर तुम्हाला मेडिकल सपोर्टची गरज आहे.