घशाचं हे इन्फेक्शन ’या’ गंभीर संक्रमणाचा असू शकतो संकेत, ‘या’ 6 घरगुती उपायांनी सुद्धा मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाईन : स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन हे घशात होणारं एक संक्रमण असून यामुळे घसा आणि टॉन्सिल प्रभावित होतात. स्ट्रेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे हे संक्रमण होतं. या संक्रमणामुळे तोंडाच्या आतील भागात पुरळ, फोड येतात. यालाच स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन म्हणतात. हे संक्रमन टॉन्सिल आणि वेदना वाढण्याचं कारण ठरतं. यापासून आराम मिळवायचा असेल तर काही घरगुती उपाय असून ते जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे
1 ताप येणे
2 गिळताना त्रास होणे
3 लाल आणि सूजलेले टॉन्सिल
4 मान दुखणे
5 चव न लागणे
6 बोलण्यास समस्या होणे

करा हे घरगुती उपाय

1 अ‍ॅलोवेरा
अ‍ॅलोवेरा जेल तोंडात फोड आले असतील तर तोंडातही लावू शकता. याने आराम मिळेल.

2 मध
तोंडात आलेल्या फोडांवर मधाचा लेप लावल्याने आराम मिळतो. यातील अँटी-ऑक्सिडेंट फायदेशीर ठरतात.

3 थंड पाणी
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या सल्ल्यानुसार, अशी समस्या असल्यास 10 मिनिटांसाठी तोंडात थंड पाणी ठेवावं. पाणी कोमट किंवा थंड झालं तर टाकून द्यावे. पुन्हा थंड पाणी तोंडात ठेवा. थंड पाण्याने गुळणी करा. याने तोंडातील फोड बरे होतील.

4 दही किंवा दूध
दही खाणे किंवा एक ग्लास थंड दूध सेवन केल्यास तोंडातील फोड कमी होऊ शकतात. जळजळ दूर होते.

5 आहार
आहारात प्रोटीनसोबतच कडधान्य, फळं, भाज्यांचा आहारात समावेश करा.

6 पाणी प्या
भरपूर पाणी प्यायल्याने सुद्धा तोंडाला आराम मिळतो. अशा इन्फेक्शनमध्ये प्रथम डॉक्टरांकडे जाणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे.