आत्महत्येपूर्वी सुशांत सिंह राजपूतनं केलं होतं ‘असं’ काही, व्हायरल व्हिडीओमुळं सोशलवर ‘खळबळ’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. नुकताच त्याचा फायनल पोस्टर मॉर्टेम रिपोर्टही आलाय. यानंतर आता कोणत्याही षडयंत्राची शंका पोलिसांना नाही. असं असतानाच आता एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामुळं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी सकळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत सिंह राजपूत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता. यानंतर आता अनेक सवाल केले जात आहेत. जो माणून गेम खेळत आहे तो डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या कशी करू शकतो असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता अनेकजण सुशांतच्या आत्महत्येकडे संशयानं पाहत त्याचा खून झाला असल्याचं बोलत आहेत. अनेक चाहते हा व्हिडीओ सोशलवर शेअरही करत आहे. दरम्यान या व्हिडीओत दावा केला जात असलेला प्ले स्टेशन आयडी हा खरंच सुशांतचा आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.