शेजारी राहणारे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळल्यास घाबरू नका, तात्काळ ‘हे’ 6 उपाय करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम-  कोरोना व्हायरसचा धोका अजूनही कायम आहे. जगभरात सोशल मीडियावरून या महामारीबाबत विविध अफवासुद्धा पसरवल्या जात आहेत. त्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र, लोकांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून सरकारने जारी केलेल्या गाईडलाइन्सचे पालन केले पाहिजे. जर तुमच्या शेजारी किंवा इमारतीमधील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला तर घाबरू नका, उलट सावधगिरी बाळगत आयसोलेट होऊन धोकादायक महामारीपासून वाचता येईल.

अशी घ्या काळजी

1 लिफ्टमध्ये स्पर्श करू नका
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. यामुळे संसर्ग रोखता येईल. याशिवाय शक्यतो लिफ्टचा वापर करू नका आणि जिन्याचा वापर करा.

2 दरवाजे आणि पृष्ठभाग वारंवार डिसइन्फेक्ट करा
लवकरात लवकर दरवाजे, लॉक, टेबल टॉप, लाईट स्विच, हँडलपासून घरातील प्रत्येक मुख्य पृष्ठभाग स्वच्छ करा आणि डिसइन्फेक्ट करा.

3 स्टीम घ्या
शेजरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच, दिवसात पाचवेळा गरम पाण्याने गुळण्या करा. सोबतच आहारात काढ्याला स्थान द्या.

4 चांगले शेजारी बना
ज्या व्यक्तीला क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे, त्याच्याविषयी चांगली भावना ठेवा. संबंधित व्यक्तीला मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या त्रास देऊ नका. त्यांचे कसलेही फोटो सोशल मीडियावर टाकू नका.

5 सहानुभूती दाखवा
क्वारंटाइनमध्ये राहात असलेल्या व्यक्तीला सहानुभूती दाखवा. मात्र, त्या व्यक्तीपासून दूर राहा.

6 मास्क लावून बाहेर पडा
हा व्हायरस हवेतून सुद्धा पसरू शकतो. यासाठी बाहेर पडताना आणि बंद ठिकाणी मास्क वापरा. घरातून बाहेर पडताना डिस्पोजल ग्लव्हज घाला.