लॉकडाऊन बाप-लेकाने विहीर खोदून पाण्याची समस्या केली दूर

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनव्हायरस नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान वडील व मुलाने विहीर खोदून भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. जेव्हा लोक लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेते होते, तेव्हा दोघांनीही आवश्यक असलेल्या समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला आणि विहीर खोदण्यास सुरुवात केली. दोघांनाही जवळपास 16 फूट खोलीत पाणी शोधण्यात यश आले. हे कुटुंब नांदेड जिल्ह्यातील मुळजारा गावात राहते.

सिद्धार्थ देवके रिक्षाचालक म्हणून काम करीत होते. लॉकडाउनमुळे काम बंद पडल्याने त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत हरवले. उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नव्हते आणि पाण्याची समस्याही त्याच्यासमोर उभी राहिली. रोजच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. यावेळी त्याने घराच्या आवारात एक विहीर खोदण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी मुलासोबत पाण्याची समस्या दूर करण्यासाठी विहीर खोदण्याचे ठरविले. देवके जमीन खोदून मुलगा पंकज खड्ड्यातून माती काढण्याच्या काम करीत होता. अशा प्रकारे आम्ही 16 फूट विहीर खोदली आणि आता आमच्याकडे पाणी आहे. हे दोघेही तीन ते चार दिवस या कामात व्यस्त होते. आता त्यांच्या घरात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून आता त्यांची मुले कधीही येथून पाणी घेऊ शकतात असे देवके यांनी सांगितले आहे .