What To Do To Prevent Heart Attack | हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी या 4 पद्धतीने घ्या स्वताची काळजी, अन्यथा जीव येऊ शकतो धोक्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – What To Do To Prevent Heart Attack | हृदय हा शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. हृदयाशिवाय जीवन ही संकल्पना निराधार आहे. कारण हृदय हा एकमेव अवयव आहे जो संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करतो. हृदय निरोगी ठेवणे म्हणूनच महत्त्वाचे आहे. पण काहीवेळा लोक कळत-नकळत अशा चुका करतात ज्यामुळे हृदय कमकुवत होते. अशावेळी हृदयविकाराचा (heart attack) धोका वाढतो. म्हणूनच आपल्या हृदयाची चांगली काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे (What To Do To Prevent Heart Attack). हृदयविकाराची कारणे आणि काळजी घेण्याच्या पद्धती जाणून घेवूयात…

 

हृदयविकाराच्या झटक्याची कारणे (Causes of heart attack) :
1. जेव्हा शरीरातील रक्तवाहिनीतील रक्त प्रवाह सुरळीत होऊ शकत नाही, तेव्हा रक्त गोठणे किंवा ब्लड क्लॉटिंगची समस्या सुरू होते.
2. या गुठळीमुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन मिळणे बंद होते.
3. ही स्थिती हृदयविकाराच्या झटक्यासारखी असते.
4. संशोधनानुसार, जे लोक रात्री 7 तास झोप घेत नाहीत त्यांना झोपेच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित आजार होतात.
5 कार्डिओमेटाबॉलिक सिंड्रोम होण्यास हे कारणीभूत असते. यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लिपिड (चरबी) प्रोफाइल बिघडणे यासारख्या समस्या उद्भवतात. (What To Do To Prevent Heart Attack)

 

सकस आहार घ्या (Eat a healthy diet) :
हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम कमी करण्यासाठी चांगला आहार घ्या. कारण आहार तुमचे हृदय निरोगी ठेवतो. तसेच संपूर्ण आरोग्य चांगले ठेवतो.
हृदयविकार टाळण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिने युक्त संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
नियमित चुकीचा आहार घेतल्याने कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
जंक फूड आणि रेड मीटचे सेवन कमी करा. कारण या दोन्ही गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

सक्रिय राहा (Stay active) :
हृदय निरोगी ठेवण्यासाठी, नेहमी सक्रिय राहा. उदाहरणार्थ, झोपण्याची, उठण्याची आणि खाण्याची वेळ ठरवा. घरातील काही कामे करा. सकाळ-संध्याकाळ फिरायला घराबाहेर पडा. योगाभ्यास करा.

 

धुम्रपानापासून दूर राहा (Stay away from smoking) :
धूम्रपानामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. सिगारेट आणि अल्कोहोल रक्तातील साखरेची पातळी वाढवते. ज्यामुळे वजन वाढते आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जास्त मद्यपान केल्याने इम्यूनिटी कमी होते, ज्यामुळे हार्ट फेल्यूअर, हृदयक्रिया बंद पडणे, हृदयविकाराचा झटका आणि संबंधित आजार धोका अनेक पटींनी वाढतो. निरोगी जीवनासाठी धूम्रपान आणि मद्यपान दोन्ही बंद करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- What To Do To Prevent Heart Attack | heart attack take care of yourself in these 4 ways otherwise you may have a cardiac arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic | तुम्हाला लसून खुपच आवडतो का? तर व्हा सावध! अति सेवन केल्याने लिव्हरचे होऊ शकते नुकसान

Pizza Burger | पिझ्झा-बर्गरची असेल आवड तर बिघडू शकते पचन, या 4 घरगुती उपायांनी ठिक करा पचनक्रिया

Uric Acid | वाढली असेल सांधेदुखी तर ‘या’ 5 पद्धतीने मिळवू शकता आराम, जाणून घ्या