मास्क घातल्यानंतर तुम्हालाही गुदमरतं का ? जाणून घ्या ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या कोरोना संकटामुळं सर्वांनाच मास्क घालणं अनिवार्य झालं आहे. परंतु सतत आणि जास्त वेळ तोंडाला मास्क असल्यानं अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. परंतु हे फुप्फुसासाठी हानिकारक ठरू शकतं.

काय सांगतात डॉक्टर ?

डॉक्टर सांगतात, पूर्ण वेळ मास्क घालून राहणं कोणालाही शक्य नाही. मास्क घातल्यानं अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो. खास करून ज्यांना श्वसनांसंबंधित आजार असतात त्यांना. फुप्फुस ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं आदान प्रदान करतं. जेव्हा तुम्ही मास्क लावता तेव्हा या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो जे फुप्फुसासाठी हानिकारक असतं. परंतु याचा धोकाही तेव्हाच जास्त असतो जेव्हा मास्क जास्त वेळ लावलं जातं किंवा जास्त घट्ट असतं.

डॉक्टर सांगतात की, फुप्फुसाला काही रोग झाला तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं आदान प्रदान करण्यात त्याला अडचण येते. म्हणून फुप्फुस मजबूत राहणं खूप गरजेचं आहे. श्वासांवर उत्तम नियंत्रण असेल तर कोणत्याही आरोग्य समस्येचा सामना करण्याचा धोका कमी होतो.

फुप्फुस मजबूत करण्यासाठी काही उपाय

1) डायाफ्रामिक ब्रिदींग ( पोटच्या साहाय्यानं श्वसन) – फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी डायाफ्रामिक ब्रिदींग केलं जातं. यात पोटाच्या स्नायूंचा वापर वापर केला जातो. या प्रकाराच्या श्वासाची क्रिया ही क्रॉनिक ऑब्सट्रक्टीव पल्मनरी डिसीजच्या लोकांना लाभदायक ठरते.

2) नियमित व्यायाम – रोज व्यायाम केला तर स्नायूंची शक्ती वाढते आणि त्यांचं कार्यदेखील सुधारतं. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा स्नायूंना कमी प्रमाणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची गरज पडते. फुपफुसाला चांगलं काम करण्यासाठी याची मदत होते.

3) भरपूर पाणी प्या – आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर शरीरातील पाण्याची पातळीही चागंली असणं गरजेचं आहे. दिवसभर योग्य आणि भरपूर प्रमाणात पाणी पित राहिलं तर फुप्फुसांमध्ये आर्द्रता राहते. यामुळं फुप्फुसं मजबूत राहण्यास मदत होते. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं.

4) उठण्या बसण्याच्या योग्य पद्धती – आपण योग्य पद्धतीनं उठलो, बसलो, उभं राहिलो तर फुप्फुसंही मजबूत राहतात. अयोग्य मुद्रा असेल तर त्यानंही श्वसनात अडथळा निर्माण होतो. म्हणून शरीराची मुद्रा योग्य असणंही गरजेचं आहे. उभं असताना किंवा बसताना पाठीला बाक नसावा. पाठ सरळ राहिल याकडे लक्ष असू द्या. उभं राहिल्यानंतर छाती पुढं काढलेली असावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.