घशात सूज अन् वेदना होताहेत का ?; असू शकतं ’या’ आजाराचं लक्षण

पोलिसनामा ऑनलाईन : टॉन्सिल्सला सूज आल्यामुळे आपल्याला खाण्या-पिण्याचाच नव्हे तर बोलण्यातही खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्या तोंडामध्ये घशाच्या मध्यभागी एक मऊ भाग आहे, त्याला टॉन्सिल्स म्हणतात. हिवाळ्यामध्ये टॉन्सिल्सची समस्या अधिक प्रमाणात उद्भवते. जर हा टॉन्सिल्स स्वतः बाह्य संसर्गाने संक्रमित झाला तर या अवस्थेस ’टॉन्सिलायटिस’ असे म्हणतात.

जाणून घेऊया टॉन्सिलायटिसचे प्रकार :

एक्यूट टॉन्सिलायटिस
एक्यूट टॉन्सिलायटिसमध्ये विषाणूने टॉन्सिल्सना संक्रमित केलं जातं. यामुळे घशात सूज येऊन टॉन्सिल्समध्ये राखाडी किंवा पांढरा थर आढळतो.

क्रोनिक टॉन्सिलायटिस :
टॉन्सिल्स जर संक्रमित झाल्यास क्रोनिक टॉन्सिलायटिसची स्थिती उद्भवत असते. त्यामुळे रुग्णांना तीव्र वेदनेचा त्रास सहन करावा लागतो.

पेरिटॉन्सिलर :
यात टॉन्सिल्सच्या आजूबाजूचे मास विकसित होत राहते. हे या आजाराचे सगळ्यात गंभीर रूप मानले जाते. याव्यतिरिक्त एक्यूट मोमोन्यूक्लिओसिस, स्ट्रे थ्रोट आणि टॉन्सिल्स स्टोन्ससारख्या समस्यांचा सामना लोकांना करावा लागण्याची शक्यता असते

हि असतात लक्षणं :
टॉन्सिल्स लाल दिसणे, सूज येणे, टॉन्सिल्सच्या जागेवर पांढरे किंवा राखाडी डाग येेणे, खाताना, गिळताना त्रास होणे, घशात तीव्र वेदना होणे, गंभीर स्थितीत ताप येणे, बोलायला त्रास होणं, आवाज लहान होणं, श्वास घेताना दुर्गंधी येणे.

लहान मुलांत आढळतात हि लक्षणं
गिळायला त्रास होणे, खाण्यासाठी त्रास होणे, चिडचिड होणे आदी.

हि आहेत कारणे :
घशात बॅक्टेरिया निर्माण झाल्यास ही समस्या उद्भवते. निमोनियामुळेही लहान मुलांत टॉन्सिलायटिसची समस्या निर्माण होते. थंड पदार्थांचा आहारामध्ये समावेश केल्यास किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यास हा असा त्रास होतो.

जर रुग्णाला ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर ताप दोन दिवसांपेक्षा जास्त झाला तर डॉक्टर अँटीबायोटिक्सचा कोर्स देतात. काही स्थितीत ही समस्या 6 ते 7 दिवसांत बरी होते. त्यासाठी थंड आणि आंबट पदार्थ खाणे टाळावे, जास्त त्रास झाल्यास आराम करावा, गरम पदार्थ खावे, घसा खवखवल्यास कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात, धूम्रपान टाळावे, संसर्ग टाळावा, ज्या ठिकाणी हवा प्रदूषित आहे तेथे जाण्याचे टाळावे.

(टीप : वाचक आदींनी आरोग्याविषयी माहिती हि माहिती व्हावी म्हणून दिली जात आहे, याची नोंद घ्यावी. तसेच स्वत:च्या जबाबदारीवर आरोग्यविषयक माहितीची खातरजमा करावी किंवा आपल्या वैद्यकीय डॉक्टर तज्ञांचा सल्ला घ्यावा. किंवा त्यांची भेट घ्यावी. धन्यवाद)