‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाच्या लग्नात अंबानींनी काय दिलं ‘गिफ्ट’ ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देसी गर्ल प्रियंका चोपडा बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ‘the sky is pink’ या सिनेमातून ती पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान प्रियंकाने आपल्या जीवनासंबंधित अनेक बाबी शेअर केल्या आहेत.
PunjabKesari
माझ्या लग्नात फक्त 180 पाहूणे होते –
सिनेमा प्रमोशन दरम्यान प्रियंकाने आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. प्रियंकाने सांगितले की आपल्या लग्नात अनेक मोठे लोक उपस्थित होते, ज्यात अंबानी यांचा देखील समावेश होते. यावेळी उपस्थितांनी अनेक भेटवस्तू दिल्या. प्रियंका म्हणाली की लग्नात 180 पाहूणे आले होते. ज्यात 120 कुटूंबातील लोकांचा समावेश होता. मला मिळालेल्या पैशांच्या पाकिटात किती पैसे होते मला माहिती नाहीत, त्यातील अर्धे पाकिटं तर मला मिळाली देखील नाहीत. परंतू लोकांकडून खूप प्रेम मिळाले, जे मला हवेहवेसे होते.

प्रियंकाच्या लग्नात अंबानीनी काय दिले गिफ्ट
प्रियंकाने कपिल शर्मा शोमध्ये सिनेमाचे प्रमोशन केले. त्यावेळी कपिलने आपल्या अंदाजात सांगितले की मला वाटते की हे लोक इतके श्रीमंत आहेत की त्यांच्या स्वत:च्या 25 हजार रुपयांच्या नोटा असतील आणि हे लोक तर दोन हजाराच्या नोटा तर बाळगतच नसतील. कपिलच्या या विनोदानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
PunjabKesari
दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ निकपासून दूर राहू शकत नाही
प्रियंकाने सांगितले की, आमचे लग्न एका मॉडर्न डे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप होते आणि आम्ही दोन आठवड्यापासून एक दुसऱ्यांपासून दूर राहू शकत नाही. मग आम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो, आम्ही एक दुसऱ्याला छोट्या छोट्या गोष्टी देखील शेअर करतो.

प्रियंकाने सांगितली आपल्या संघर्षाची कहानी
आपला स्ट्रगल सांगताना प्रियंका थोडी भावूक झाली होती. ती म्हणाली की मला काहीही न सांगता एक सिनेमात रिप्लेस करण्यात आले होते. एकदा मला या बद्दल माझ्या को अ‍ॅक्टरने मला सांगितले आणि एकदा वृत्तपत्रामध्ये वाचले. त्यानंतर मी निश्चित केले की या परिस्थितीत अडून राहणार नाही. त्यावेळी मी माझ्या वडीलांकडे रडत गेले आणि विचारले मीच का ? परंतू जेव्हा त्यांनी मला विचारले की आता तू काय करणार ? तेव्हा मी उत्तर दिले की पुढच्या सिनेमात मी स्वत: सिद्ध करणार. त्यानंतर मी निश्चय केला की मी आता माझ्या बाजूने अत्यंत चांगले काम करणार, सिनेमा चालला नाही तरी मी चांगले काम करत राहणार.
PunjabKesari
पुढे प्रियंकाने सांगितले की, इंडस्ट्रीत कधीही कोणालाही रिप्लेस केले जाऊ शकते, कारण येथे महिलांची वॅल्यू पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. येथे हा एक नॉर्म आहे जो जगाच्या पितृसत्ताक समाजाने तयार केला. आपल्या पिढीला पुढील पिढीसाठी बदलायला हवे. प्रियंकाचा सिनेमा 11 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात प्रियंकाबरोबर फरहान अख्तर लीड रोलमध्ये आहे.

Visit : Policenama.com