‘नागरिकत्व’ विधेयकाबाबत शिवसेना राज्यसभेत वेगळी भूमिका घेणार ? संजय राऊत सांगतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल सोमवारी (9 डिसेंबर) रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी मंजूर झाले आहे. लोकसभेत शिवसेनेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन करत सरकारच्या बाजूने मतदान केले. मात्र लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. याविषयी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मात्र राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार की विरोध करणार या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं.

संजय राऊत म्हणाले की , ‘शिवसेनेने लोकसभेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. असे असले तरी राज्यसभेमध्ये शिवसेना या विधेयकाबाबत वेगळा विचार करू शकते. या विधेयकात आम्ही काही बदल सुचवले आहेत. त्याबाबत आम्ही प्रश्न विचारणार आहोत.’

Advt.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागणार आहे. हे विधेयक पारित करून घेण्यासाठी भाजपाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.राज्यसभेत सत्ताधारी भाजपकडे पूर्ण बहुमत नसले तरी विधेयक संमत करण्यासाठी पुरेसे संख्याबळ रालोआकडे असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

Visit : Policenama.com