रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mukesh Ambani | देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ( Reliance) ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवारी होत असून त्यात समुहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

या सभेमध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अनेक महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिओ सह अनेक टेलीकॉम कंपन्यांना देशामध्ये ५ जी सेवांचे परिक्षण करण्यास दूरसंचार विभागाने परवानगी दिली आहे. नुकतीच मुंबईमध्ये जियो (jio) ने 5G फील्ड टेस्टिंग केली आहे. लवकरच इतर शहरांमध्ये त्याची चाचणी केली जाणार आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. ही सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजता सुरु होणार आहे.

त्याचबरोबर स्वस्तातील 5G मोबाईल फोन, लॅपटॉप यांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी आपले तेलपासून रसायनच्या कारभारातील २० टक्के भागीदारी सौदी अरामको Saudi Aramco याला विकण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

कंपनीची सर्वसाधारण सभा वानखेडे स्टेडियममध्ये घेण्याची परंपरा मुकेश अंबानी यांनी सुरु केली होती.
मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून ही सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :

हे देखील वाचा

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

5G ला विसरून जा ! Samsung आणतंय 6G, मिळेल 5 जीच्या तुलनेत 50 पट जास्त वेग

Pune City Police | शहर पोलीस दलातील 575 पोलीस अंमलदाराना आज पदोन्नती

Pune Crime News | पुण्यातील बुधवार पेठेत महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ