यामुळेही वाढू शकतो ‘टाइप २ डायबिटीस’चा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डायबिटीस हा आजार सध्या जगभर मोठ्याप्रमाणात वाढत आहे. पूर्वी शहरापुरता मर्यादित असणारा डायबिटीस आता ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. लोकांची जीवनशैली बदलल्याने हा आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहे. काही लोकांचा असा समज आहे की, जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो. मात्र हा चूकीचा समज आहे. जीवनशैली, आहार आणि अन्य सवयी या तीन मुद्द्यांवर टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका अवलंबून असतो. शिवाय, जर डायबिटीस बरा झाल्यास तर आणखी काळजी घेतली पाहिजे.

अमेरिकेच्या मेरीलँड येथील बाल्टीमोरमधील न्यूट्रीशनच्या मीटिंगमध्ये एका संशोधनाचे निष्कर्ष मांडण्यात आले. यामध्ये नमूद केले होते की, एखादी व्यक्ती काय खाते आणि कशाप्रकारे खाते याचा प्रभाव टाइप २ डायबिटीस होण्याच्या शक्यतेवर पडतो. या संशोधनासाठी अमेरिकेतील २ हजार ७१२ तरूण-वयस्क लोकांना सहभागी करण्यात आले होते. त्यांच्या डाएटवर लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच फॉलोअपही घेण्यात येत होतो. ज्या लोकांनी साधारण २० वर्षांपर्यंत फळे, भाज्या, धान्य, नट्स, ड्रायफ्रूट्स आणि व्हेजिटेबल आइलचा त्यांच्या आहारात समावेश केला, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका ६० टक्के कमी झाला. जर जास्त काळासाठी प्लांट बेस्ड डाएटचे जास्त सेवन केले तर डायबिटीस होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.

डाएटमध्ये पदार्थांमधून किंवा सप्लिमेंट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी२ आणि व्हिटॅमिन बी६ चं जास्त असल्यास टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो. दुसऱ्या एका संशोधनात २ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये असे दिसून आले की, वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी १२ चे अधिक प्रमाणात सेवन केले तर टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. म्हणजेच अ‍ॅनिमल बेस्ड प्रॉडक्टचे जास्त सेवन केल्यास डायबिटीसचा धोका वाढतो. कशाप्रकारे जेवण करता किंवा काय जेवण करता याचा तुमच्या ब्लड शुगर लेव्हलशी खोलवर संबंध असतो. आधी भात खाणे आणि नंतर भाजी किंवा मांस खाणे यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण वाढते. जर आधी भाजी किंवा मांस खाल्ले आणि नंतर भात खाल्ला तर ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/