सावधान ! ‘इन्कम टॅक्स’कडून नोटिस मिळाल्यानंतर घाबरू नका, ही काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्यास घाबरून जायचे काही कारण नाही. अनेकदा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरल्यानंतरही आयकर विभागाची नोटीस मिळू शकते. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आकडेवारीत झालेला घोळ, इन्कम रक्कम योग्य पद्धतीने न भरणे किंवा इतर कारणास्तव इन्कम टॅक्स विभागाकडून तुम्हाला नोटीस मिळू शकते.

तज्ञांचे मत काय आहे ?

टॅक्स संबंधी पाठवण्यात येणाऱ्या नोटीसला सिस्टीमच्या टॅक्स लॉजिकच्या आधारावर लागू केले जाते. करदाता फक्त तेव्हाच या नोटीसपासून वाचू शकतो जेव्हा तो सुनिश्चित करतो की टॅक्स रिटर्न योग्य पद्धतीने भरले आहेत. आयटीआर आणि फॉर्म AS २६ मध्ये दिलेले इन्कम टॅक्ससंबंधी तपशील (डिटेल्स) एक सारखे असतील. कोणत्याही वित्तीय वर्षात क्रेडिट कार्ड द्वारे २ लाख रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सक्शन केले नाही पाहिजेत. बँक खात्यात जमा असलेली रक्कम ठरलेल्या सीमेच्या आत पाहिजे आणि आयटीआरमध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर्सची माहिती देण्यात आली असावी.

नोटीस काळजीपूर्वक वाचा

इन्कम टॅक्सची नोटीस मिळाल्यानंतर गोंधळून न जाता काळजीपूर्वक ती नोटीस वाचा. नोटीस पाठवण्याचे कारण समजून घ्या यावरून नोटीस किती महत्वाची आहे हे कळेल. या नोटीसवर उत्तर देण्याची कालावधी जाणून घ्या. वेळेत उत्तर न दिल्यास तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

आयकर विभागाला द्या सर्व माहिती

जर आयकर विभागाकडून तुमची तपासणी चालू असेल तर विभागाने मागितलेली सर्व माहिती वेळेत द्या. विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसला उत्तर न दिल्यास तुम्हाला आयकर विभागाच्या नियमानुसार मोठा दंड भरावा लागेल. अशा कारवाईपासून वाचण्यासाठी आयकर वेळेत आणि योग्यपद्धतीने भरला पाहिजे. या विषयाची माहिती आपल्याला नसल्यास तज्ञांची मदत घ्या.

आरोग्यविषयक वृत्त –