थोतांड ! असली कसली अंधश्रद्धा, ‘कोरोना’चा ‘खात्मा’ करण्यासाठी चक्क 400 बकऱ्यांचा बळी

कोडरमा/झारखंड : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहेत. कोरोनाला पळवून लावण्यासाठी लोकांमध्ये वेगवेगळ्या आंधश्रद्धा देखील या काळात निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी पूजा-आर्चा केली जात आहे तर कुठे बळी दिले जात आहेत.
कोरोना महामारीचा प्रतिबंध फक्त उपचारातून केला जाऊ शकतो. यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. जसे मास्क घालणे, वेळोवेळी हात धुणे, बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर ठेवणे, कोणाशी हात न मिळवणे, असे करणे आवश्यक आहे. मात्र अंधश्रद्धेला आहारी गेलेल्या लोकांनी कोरोना विषाणूला पळवून लावण्यासाठी चक्क 400 बकऱ्यांचा बळी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. झारखंडमधील कोडरमा येथे हा प्रकार घडला आहे.

कोडरमा जिल्ह्यातील चांदवारा ब्लॉक अंतर्गत उरवण या गावी असलेल्या देवीच्या मंदिरात श्रद्धेच्या नावाखाली बुधवारी (दि.10) सकाळपासून अंधश्रद्धेचा हा खेळ सुरु होता. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी देवीच्या मंदिरात हवन, पूजन, आरती करण्यात आली. स्त्रियांनी भक्तीगीते गायली. देवीला संतुष्ट करण्यासाठी निष्पापांचा बळी दिला नाहीतर त्याला अंधश्रद्धा कसे म्हणायचे. सुरुवातील कोंबड्यांची बांग देण्यात आली. यानंतर एकामागून एक बकऱ्यांचा बळी देण्यात आला.

गावच्या प्रमुखाने एका कुटुंबाच्या मागे एक बकरीचा बळी देण्याचे ठरविले होते. गावात जवळपास 500 घरं आहेत. त्यापैकी 80 टक्के लोकांनी देवीला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी तिला संतुष्ट करण्यासाठी बकऱ्यांचा बळी दिला. यापूर्वी गावातील लोकांनी मंदिर रंगवले आणि त्याठिकाणी पठण केले होते. बुधवारी पठणाचा समारोप झाला. यानंतर हवन करण्यात आले. हवनानंतर यज्ञ सुरु झाला. या विषयी गावातील महिलांनी सांगितले की, गावात कोरोना पसरलेला नाही, म्हणून देवीची पूजा एकत्रितपणे केली जात आहे. यावर गावातील लोकांनी बोलण्यास नकार दिला.