व्हॉट्सअ‍ॅप बंद ? व्हिडीओ-फोटो ‘अपलोड’ आणि ‘डाऊनलोड’ न झाल्यानं लाखो युजर्स झाले ‘हैराण-परेशान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशनमध्ये रविवारी बर्‍याच अडचणी निर्माण झाल्याचा अनुभव लाखो युजर्सला आला. तांत्रिक अडचणींमुळं व्हिडीओ आणि फोटो डाऊनलोड आणि अपलोड होत नव्हते. अचानकपणे ही खराबी आल्यामुळं लाखो युजर्स परेशान झाले.

लाखो युजर्सला ही अडचण निर्माण झाल्यानंतर #whatsappdown ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्या समस्या सांगितल्या. रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपलिकेशन डाऊन झालं होतं असं सांगण्यात येत आहे.

लाखो युजर्स फोटो, व्हिडीओ आणि स्टीकर पाठविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यामध्ये ते यशस्वी होत नव्हते. दरम्यान, याबाबत व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप काही एक सांगण्यात आलेलं नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like