प्रेमदासा Vs राजपक्षे ! श्रीलंकेच्या ‘राष्ट्रपती’ पदाच्या निवडणुकीत कोण विजयी झालं तर होईल भारताला फायदा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीवर अनेक देशांचे लक्ष आहे. श्रीलंकेची आणि चीनची वाढत असलेली मैत्री लक्षात घेऊन भारताची देखील या निवडणुकीवर नजर आहे. भारताचे आणि श्रीलंकेचे नेहमीच चांगले संबंध राहिलेले आहे त्यामुळे आता कोणत्या राष्ट्रपतींच्या विजयाने भारताला काय फायदा होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

कोण आहेत उमेदवार
या निवडणुकीमध्ये सत्तारूढ पार्टीचे 52 वर्षीय उमेदवार आणि गृहनिर्माण मंत्री सजित प्रेमदासा तसेच माजी संरक्षण सचिव अर्थात विरोधी पक्षातील 70 वर्षीय नेता गौतबाया राजपक्षे यांच्यात सामना रंगणार आहे. नॅशनल पीपुल्स पावर (एनपीपी) युतीचे अनुरा कुमारा दिसानायके हे सुद्धा एक मजबूत उमेदवार मानले जात आहेत. दोनीही उमेदवार मोठ्या राजकीय घराण्यातून येतात प्रेमदासा हे माजी राष्ट्रपती रणसिंघे प्रेमदासा यांचे सुपुत्र आहेत. 1993 मध्ये LTTE ने त्यांची हत्या केली होती. तसेच गौतबाया राजपक्षे हे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत.

भरतासोबतचे संबंध
या दोघांसोबत भारताला चांगले संबंध होण्याची आशा आहे. 1987 – 90 पर्यंत भारतीय शांती सेनेसाठी श्रीलंकेमध्ये गुप्त पद्दतीने काम केलेले रिटायर्ड कर्नल आर हरिहरन यांचे म्हणने आहे की, भारताला दोनीही उमेदवारांपैकी कोणाचीही काळजी करण्याची गरज नाही. ते म्हणाले, ‘इलाम युद्धाच्या वेळी गौतबाया राजपक्षे संरक्षण सचिव होते. त्याचवेळी त्याचा भाऊ तेथील राष्ट्रपती होता. त्या दिवसांमध्ये, तामिळनाडूमध्ये श्रीलंकेविरूद्ध आवाज उठला होता. असे असूनही, नवी दिल्लीने हा विषय फार मोठा होऊ दिला नाही. राजपक्षे यांच्यावरही त्या काळात मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप होता, परंतु भारताच्या पाठिंब्यामुळे संयुक्त राष्ट्राची वृत्ती नरम झाल्याचे दिसून आले होते.

राजपक्षे यांचे चीन प्रेम
राजपक्षे यांच्या निवडणुक प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचा विषय हा प्रमुख मुद्दा होता, त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात म्हंटले होते की, सुरक्षा संबंधांबाबत त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. परंतु भारताला या गोष्टीची देखील चिंता आहे की राजपक्षे यांना चीनसोबत सुद्धा चांगले संबंध ठेवायचे आहेत. चीनने त्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय फंडिंग केल्याची चर्चा देखील आहे.

सजित प्रेमदासा यांच्यासोबत भारताचे संबंध चांगले होऊ शकतात, तामिळ ननॅशनल एलायन्स पार्टीने या आधीच सजित प्रेमदासा यांना समर्थन दिलेले आहे. रिटायर कर्नल हरिहरन म्हणतात, ज्यावेळी पंतप्रधान मोदी श्रीलंका दौऱ्यावर गेले होते त्यावेळी सजित प्रेमदासा हे मोदींसोबत होते. त्यावेळी या दोनीही नेत्यांमध्ये मोठी सकारात्मकता दिसत होती. सजित हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना भारतासोबतच्या चांगल्या वाईट अशा सर्व संबंधांबाबत माहिती आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like