आता लॅपटॉप-कम्प्युटर युजर्सही करू शकणार WhatsApp कॉलिंग, जोडले नवीन फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असत. आताही व्हाट्सअ‍ॅपने डेक्सटॉपवर नवीन फिचर जोडले आहे. ज्यामुळे व्हाट्सअ‍ॅपच्या डेक्सटॉप अ‍ॅपवरूनही युजर्स व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करू शकतील. व्हाट्सअ‍ॅपची पॅरेन्ट कंपनी फेसबुकने याबाबत माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंप्यूटरवर काम करणाऱ्या लोकांना आता दिलासा मिळणार आहे. त्यांना व्हाट्सअ‍ॅप कॉलिंगसाठी फोनचा वापर करावा लागतो. मात्र आता हे यूजर्स डेक्सटॉपवरूनही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्यास सक्षम असतील.

दरम्यान, आता काही लिमिटेशन्ससह याची सुरुवात केली जाणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून याची टेस्टिंग देखील करत होती आणि अखेर हे युजर्ससाठी वापरात येणार आहे. व्हाट्सअ‍ॅपच्या मते, व्हाट्सअ‍ॅपच्या विंडो आणि मॅक अ‍ॅपमध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग देण्यात येणार आहे. सध्या यात ग्रुप कॉलिंगचा सपोर्ट देण्यात आलेला नाही. मात्र येणाऱ्या काळात कंपनी यावरही ग्रुप कॉलिंग फिचर जोडणार आहे.

डेस्कटॉप वरून व्हिडिओ कॉल केले जात असल्याने कंपनीने पोर्ट्रेट व लँडस्केप मोडसुद्धा दिले आहेत. व्हिडिओ कॉलिंग दरम्यान, व्हिडिओ विंडो टॉपवर राहील जेणेकरून, मल्टिपल टॅबमध्ये चॅट केल्यामुळे व्हिडिओ कॉल प्रभावित होणार नाही आणि आपण व्हिडिओ सतत पाहू शकता.

दरम्यान, डेक्सटॉपवरील हे व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉल फिचर व्हाट्सअ‍ॅप वेबवर आले नाही. व्हाट्सअ‍ॅप वेब ब्राउझरद्वारे प्रवेश केला जातो, तर हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप अ‍ॅपसाठी आहे. तसेच, व्हाट्सअ‍ॅपच्या म्हणण्यानुसार, व्हाट्सअ‍ॅप डेस्कटॉपवरून केलेले ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल एन्ड टू एंड एन्क्रिप्टेड असतील. कंपनीने म्हंटले कि, मोबाईलवरून कॉलिंग करणे असो कि व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप वरुन कॉलिंग सुरक्षित आणि खासगी राहील.