WhatsApp कॉलिंगमध्ये जोडले गेले ‘हे’ खास फिचर, ‘चॅटिंग’ स्क्रीनचं डिझाइन देखील बदलणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप WhatsApp कॉलिंगमध्ये नवे फीचर उपलब्ध करुन दिले आहे. नव्या वर्जनमध्ये अपडेट 2.19.120 मध्ये कॉलिंग वेटिंगचे फीचर देण्यात आले आहे. याआधी वॉट्सअ‍ॅप कॉलिंगमध्ये असे फीचर देण्यात आले नव्हते. हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप कॉल अजून चांगले सेवा देईल. नव्या अपडेटसह WhatsApp च्या चॅटिंग स्क्रीनमध्ये बदल झाला आहे. याशिवाय यात ब्रेल की बोर्ड देखील सपोर्ट करणार आहे जेणे करुन दिव्यंगांना याचा वापर करत येईल.

WhatsApp चे 2.19.120 वर्जन अपडेट सध्या आयफोन यूजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. कॉल वेटिंग सपोर्टचा विचार केला तर या फीचरमध्ये तुम्ही कॉलवर असताना देखील दुसरा कॉल अ‍ॅक्सेप्ट करु शकतात. आयफोन यूजर्स व्हॉट्स अ‍ॅपचे अपडेट घेऊ शकतात. अपडेटच्या चेंजलॉगमध्ये नव्या फीचरची माहिती दिली आहे. यात कॉलिंगच्या या नव्या फीचरची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही कॉल वेटिंग सपोर्टचा विचार केला तर या फीचरमध्ये तुम्ही कॉलवर असताना देखील दुसरा कॉल अ‍ॅक्सेप्ट करु शकतात.

आयफोनच्या अपडेटमध्ये चॅटिंग स्क्रीन डिझाइन देखील बदलले आहे. व्हाइस ओवर मोडच्या माध्यामातून ब्रेल लिपीत देखील मेसेज सेंट करु शकतात. स्क्रीन डिझाइन बदल्यामुळे मेसेज पाहणे अधिक आकर्षित झाले. नव्या फीचरमध्ये ग्रुप प्रायवेसी सेटिंग्स महत्वाच्या आहेत. याशिवाय सतत समोर येत आहे की लवकरच कंपनी डार्क मोड देण्याची तयारी करणार आहे.

Visit : Policenama.com