WhatsApp नं डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी जारी केला ‘फेस’ आणि ‘फिंगरप्रिंट’ अनलॉक, ‘असं’ करेल काम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉपसाठी अ‍ॅडिशनल सिक्युरिटी फीचर्सची घोषणा केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जेव्हा वापरकर्ते त्यांचे अकाउंट कॉम्पुटरशी लिंक करतील, तेव्हा त्यांना अ‍ॅडिशनल सिक्युरिटी मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना आता अकाउंट वेब किंवा डेस्कटॉपवर लिंक करण्यापूर्वी व्हेरिफाय करावे लागेल. हे नवीन फीचर लवकरच जगभरातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे अँड्रॉइड वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा डेस्कटॉपच्या व्हेरिफिकेशनसाठी आपले फेस किंवा फिंगरप्रिंट अनलॉक वापरण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, आयफोन (iPhone) वापरकर्त्यांना आपले अकाउंट फेस आयडीद्वारे व्हेरिफाय करावे लागेल.

हे सिक्युरिटी व्हेरिफिकेशन तेव्हा समोर येईल, जेव्हा वापरकर्ते त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट एखाद्या लॅपटॉप किंवा पीसीला कनेक्ट करतील. तसेच ही प्रोसेस फोनवरून क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी दिसेल. कंपनीने म्हटले आहे की या नवीन फीचरमुळे आपल्या घरातील व्यक्ती किंवा ऑफिसमेट आपल्या अकाउंटला आपल्या माहितीशिवाय इतर डिव्हाइसशी जोडण्याची शक्यता दूर करेल.

व्हॉट्सअ‍ॅपने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी आपल्या डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमद्वारे स्टोअर केलेल्या बायोमेट्रिक माहितीवर प्रवेश करू शकत नाही. कंपनीने हे देखील म्हटले आहे की नवीन सिक्युरिटी फीचर फोनवर व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या व्हिज्युअल रीडिझाइनसह लाँच होईल.