WhatsApp नं आणले 3 ‘दमदार’ अन् ‘शानदार’ फीचर्स, आता होणार मोठा बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉट्सअ‍ॅप सर्वांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे फीचर्स मिळतात ज्याचा वापर मेसेजिंगसाठी तुम्ही करू शकता. आता वॉट्सअ‍ॅपने नवीन तीन फीचर्स आणले आहेत. ज्यामुळे वॉट्सअ‍ॅपमध्ये मोठे बदल होणार आहेत.

कसे असतील नवे फीचर्स

१) वॉट्सअ‍ॅप रिमाइंडर फीचर
आता वॉट्सअ‍ॅपद्वारे आवश्यक कामांचे रिमाइंडर वापरकर्त्यांना मिळवता येणार आहे. यामुळे आता युजर्सला आठवणीत रहावे असे कोणतेही टास्क स्वीकारता येणार आहे आणि त्यानंतर अशा कामांसाठी तुम्ही रिमाइंडर लावू शकता. मात्र हा रिमांडर लावण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Any.do नावाचे अ‍ॅप असणे गरजेचे आहे आणि हे तुम्हाला वॉट्सअ‍ॅपशी जोडावे लागणार आहे. मात्र हे अ‍ॅप मोफत नाही तर यासाठी चार्जेस द्यावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्ही हवे ते रिमाइंडर सेट करू शकता. तसेच लावलेले रिमाइंडर काँटॅक्टला देखील पाठवू शकता.

२) कॉल वेटिंग फीचर
वॉट्सअ‍ॅपने दिलेल्या सुविधांचा अनेक जण वापर करतात त्यामुळे दिवसेंदिवस वॉट्सअ‍ॅपवर कॉलिंग वाढत चाललेले आहे. हीच बाबा लक्षात घेऊन वॉट्सअ‍ॅपने कॉल वेटिंग फिचर सुरु केले आहे. यामध्ये तुम्ही एखाद्या कॉलवर व्यस्त असाल तर आलेल्या कॉलचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. ही सेवा व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील वापरली जाणार आहे. वॉट्सअ‍ॅप अपडेट केल्यानंतर या फीचरचा वापर करता येणार आहे. कॉल वेटिंगवर दिसत असला तरी कॉल होल्डवर ठेवण्याचे फिचर अद्याप आलेले नाही.

३) ग्रुप इनव्हाईट फिचर
वॉट्सअ‍ॅपवर केल्या जाणाऱ्या ग्रुपमुळे तुम्ही हैरान असाल तर एक महत्वाचे फिचर आहे आता तुमच्या परवानगी शिवाय कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. याबाबतची सेटिंग तुम्हाला प्रायवसी सेटिंगमध्ये पहायला मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/