Whatsapp Banking | सरकारी बँकेची नवी सुविधा ! आता बँकेत न जाता व्हॉट्सअॅपवरुन करता येणार अनेक कामे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Whatsapp Banking | आता बँकेत न जाता व्हॉट्सअॅपवरुन अनेक कामे करता येणार आहेत. एसबीआयने WhatsApp बँकिंग सुरु केले आहे. या सुविधेमुळे शाखेत न जाता व्हॉट्सअॅपवरून बरीच कामे करता येतील. बँकेने दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर चॅट करुन बँक बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटची माहिती मिळू शकते. (Whatsapp Banking)
अशी सुरू करा सुविधा
– ही सेवा सुरू करण्यासाठी प्रथम WAREG लिहून स्पेस द्या.
– नंतर खाते क्रमांक लिहून 7208933148 वर WAREG खाते क्रमांक टाइप करून 7208933148 वर मेसेज पाठवा.
– हा मेसेज एसबीआय खात्यात नोंदणीकृत नंबरवरुन पाठवा.
– नोंदणी पूर्ण झाल्यावर, व्हॉट्सअॅप नंबरवर एसबीआयच्या 90226 90226 क्रमांकावरून एक मेसेज येईल.
– इच्छित असल्यास, हा नंबर सेव्ह करा.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हाय टाइप करुन चॅट करा. यानंतर एसबीआयकडून एक मेसेज येईल. हा मेसेज असा असेल (Whatsapp Banking) –
प्रिय ग्राहक, एसबीआय व्हॉट्सअॅप बँकिंग (SBI Whatsapp Banking) सेवेत स्वागत आहे!
कृपया खालीलपैकी कोणत्याही पर्यायातून निवडा.
1. अकाऊंट बॅलन्स.
2. मिनी स्टेटमेंट.
3. व्हॉट्सअॅप बँकिंगवरुन नोंदणी रद्द करा. तुम्ही तुमची शंका देखील टाइप करु शकता.
तुम्ही 1 टाइप करुन पाठवल्यास चॅटिंगवर अकाऊंट बॅलन्सची माहिती 2 टाईप करून पाठवल्यास मिनी स्टेटमेंटचा तपशील मिळेल. 3 टाइप करुन पाठवल्यास व्हॉट्सअॅप बँकिंगमधून नोंदणी रद्द होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या एसबीआयच्या व्हॉट्सअॅप बँकिंगवर केवळ या 3 सुविधा मिळतील. हळूहळू आणखी सुविधांचा समावेश केला जाईल. बँकेतील लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याचा त्रास या सुविधेमुळे टळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सुविधा 24 तास 7 दिवस उपलब्ध असेल.
Web Title :- Whatsapp Banking | now without going to the bank many things can be done through whatsapp state bank of india sbi has started the facility
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा