‘या’ कारणामुळं WhatsApp करतंय ‘युजर्स’ आणि ‘ग्रुप’ला ‘बॅन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेरगिरी होत असल्याच्या प्रकारानंतर आता कंपनीने विविध ग्रुप बॅन करायला सुरुवात केली आहे. आक्षेपार्ह आणि संशयास्पद नावे असणाऱ्या ग्रुपवर हि कारवाई करण्यात येत असून हॅकिंगमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाट्सअ‍ॅपने अशाप्रकारच्या अनेक ग्रुपवर कारवाई केली असून एका युझरने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ग्रुपच्या विचित्र नावामुळे त्याचा ग्रुप बॅन करण्यात आला असून त्या ग्रुपवरील सदस्यांना देखील बॅन करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांनी कंपनीची संपर्क साधत तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीने तुम्ही अटी आणि शर्थींचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यापुढे व्हाट्सअ‍ॅप वापरताना तुम्हाला फार काळजी घ्यावी लागणार आहे.

Picture in Picture मोडच्या माध्यमातून व्हाट्सअ‍ॅपने नवीन फिचर आणले असून या माध्यमातून तुम्ही YouTube व्हिडीओ एका फ्लोटिंग विंडोमध्ये दिसू शकणार आहेत. त्याचबरोबर आता यापुढे Netflix वरील ट्रेलरचे व्हिडीओ थेट तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्ले करू शकता.

दरम्यान, या सगळ्यामध्ये सामान्य नागरिकांनी आणि युझर्सनी सतर्क राहण्याची गरज असून लवकरात लवकर अशा ग्रुपमधून बाहेर पडावे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like