‘Facebook’चं ‘हे’ नवं फीचर आता ‘WhatsApp’ मध्ये !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फेसबुकप्रमाणे मेसेंजरचं सिक्रेट फीचर अ‍ॅप आता व्हॉट्सअ‍ॅपमध्येही पाहायला मिळणार आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले मेसेजही आपोआप गायब होणार आहेत. लवकरच हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप युजरला मिळणार आहे. आधी हे फीचर फेसबुक मेसेंजरला होतं. यासाठी तुम्हाला मेसेंजरचं सिक्रेट फीचर युज करावं लागायचं .

व्हॉट्सअ‍ॅपनं अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी एक बीटा अपडेट जारी केलं आहे. या व्हर्जनमध्ये Delete Message नावाने हे फीचर दिसणार आहे. याआधी हे फीचर Disappearing Message नावाने होतं.

या बीटा व्हर्जनमध्ये डार्क मोडचं फीचरही मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युजर डार्क मोडची वाट पहात होते. सध्या हे दोन्ही फीचर्स डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहेत. सध्या त्यांची टेस्टींग सुरू आहे. अँड्रॉईडच्या बीटा व्हर्जन 2.19.348 मध्ये हे फीचर पाहायला मिळणार आहे. याचं स्टेबल व्हर्जन कंपनी कधी जारी करणार आहे हे अद्याप समजलेलं नाही. जर तुम्हाला हे फीचर वापरायचं असेल किंवा टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला गुगल प्ले बीटा प्रोग्रामसाठी साईन अप करावं लागेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही APK मिररमध्येही बीटा व्हर्जन डाऊनलोड करून टेस्ट करू शकता.

रिपोर्टनुसार, या फीचरमध्ये विशिष्ट एक मेसेज नाही तर पूर्ण कॉन्व्हर्सेशन डिलीट होईल. यासाठी तुम्ही टायमर सेट करू शकता. अद्याप हे मात्र समोर आले नाही की, हे फीचर केवळ ग्रुप चॅटसाठी असेल की सर्व चॅटसाठी असेल.

Visit : Policenama.com 

 

You might also like